आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टीईटी’बाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - डी. एड. आणि बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली. 2013 च्या अखेर ही परीक्षा घेण्यात येईल, असे घोषित करण्यात आले. मात्र अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर झाली नाही. विशेष म्हणजे या परीक्षेचा अभ्यासक्रमही निश्चित झाला नसल्यामुळे या वर्षी परीक्षा होण्याची शक्यता मावळली आहे. त्यातच शहरातील खासगी क्लासवाले गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्यामुळे विद्यार्थ्यामधील संभ्रम अधिकच वाढत आहे.

कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यात ही परीक्षा पद्धती स्वीकारली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाकडून (एमएससीई) ही परीक्षा घेतली जाणार आहे. पण, अद्याप परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर नसल्याने गोंधळ वाढलेला आहे. मागील वर्षी शासनाकडून डी.एड. सीईटीची कोणतेही अधिकृत घोषणा झाली नव्हती. मात्र काही खासगी संस्थांकडून प्रचार करण्यात आला आणि हजारो विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली. या वेळी तर परीक्षा निश्चित होणार का? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार टीईटी नोव्हेंबरमध्येच होईल. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना आल्या नाहीत. त्यानुसार लवरकच संकेतस्थळावर अभ्यासक्रम व तारीख जाहीर करण्यात येईल. मार्गदर्शक सूचना करण्यात येतील. डॉ. रामचंद्र कोरडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण संस्था

टीईटी नोव्हेंबरमध्ये होणार आहे, अशी चर्चा आहे. मात्र अद्यापही अभ्यासक्रम व तारीख जाहीर करण्यात न आल्यामुळे परीक्षा कधी होणार हा प्रश्न पडला आहे. शासनाने परीक्षेची तारीख जाहीर करावी. सविता भंडकुबे, टीईटी परीक्षार्थी

टीईटीबाबत तारीख आणि अभ्यासक्रमाची अधिकृ त माहिती देण्यात आली नाही. केंद्रात रोज 50 जण चौकशीसाठी येतात. विद्यार्थ्यांना मागील सीईटीचा वाईट अनुभव असल्याचे आगामी टीईटीबाबतही संभ्रम आहे. संतोष चवरे,संचालक, विद्यानिकेतन केंद्र