आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात उभारणार वस्त्रोद्योग व्यापार केंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- वस्त्रोद्योगवाढीसाठी सोलापूर शहरात वस्त्रोद्योग व्यापार केंद्र, उद्योग संकुल आणि उद्योग भवन उभे करण्याची ग्वाही महसूलमंत्री एकनाथ खडसे, उद्योगमंत्री प्रकाश मेहता आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. येथील नियोजित रोबोटेक्स विव्हिंग पार्कच्या शिष्टमंडळाने त्यांच्या भेटी घेतल्या. उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचीही भेट झाली. त्यांनी सोलापूरच्या वस्त्रोद्योगासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. रोबोटेक्सचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर मिरजकर, यंत्रमागधारक संघाचे सहखजिनदार अंबादास बिंगी, माजी नगरसेवक भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनी मुंबईत संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेतल्या.
मंदी असल्याने पक्क्या मालाला भाव नाही, यंत्रमागांचे आधुनिकीकरण नाही, मनुष्यबळाचा तुटवडा आदी अडचणी मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. दूरगामी उपाययोजना केल्यास सोलापूर वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र होईल. व्यापार केंद्र िनर्माण केल्यास छोट्या कारखानदारांचा प्रश्न सुटेल, असेही शिष्टमंडळाने सांगितले.

उद्योगांना देण्यात येणाऱ्या सर्व परवान्यांचे एकच केंद्र असावे, या हेतूने ‘उद्योग भवन’ची संकल्पना आहे. असे एक केंद्र साेलापूरला देण्याविषयी श्री. जन्नू यांनी आग्रही मागणी केली. त्यावर उद्योगमंत्री मेहता यांनी अनुकूलता दर्शवली. शिवाय, सांगली येथे असणाऱ्या एमआयडीसीचे विभागीय कार्यालयही सोलापूरला देण्याचे ठोस आश्वासही त्यांनी दिले. सोलापूरच्या यंत्रमागधारकांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची मुंबईत भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.