आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाईचा धसका : नंबरप्लेट, पीयूसी काढण्यास वाढली गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दुचाकीला पीयूसी नाही, फॅन्सी नंबर प्लेट, दुचाकीला विमा नाही अशा वाहनांवर पाच दिवसांपासून वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांच्याकडून मोठी दंडात्मक कारवाई सुरू आहे. ही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पीयूसी, नंबर प्लेट रंगवण्याकरता नागरिकांची दुकानात गर्दी होत आहे. विमा उतरवण्यासाठी विमा प्रतिनिधींना आता अच्छे दिन आले आहेत. सोमवारी सात रस्ता, आयटीआय, सरस्वती चौक, मार्केट यार्ड भागात पोलिसांनी मोहीम राबवून सुमारे सव्वाशे गाड्यांवर कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.
नंबरप्लेटसाठी गर्दी वाढली
फॅन्सी नंबर प्लेट काढल्यानंतर सुमारे सत्तरहून अधिक गाड्या एका पेंटरकडे रंगवण्यास येत आहेत. काहीजण रेडियमच्या दोन इंची अक्षरात प्लेट तयार करून घेतात. कारवाईच्या अगोदर दररोज पाच ते दहा नवीन गाड्या रंगवण्यासाठी अथवा फॅन्सी नंबर प्लेट तयार करण्याकरता ग्राहक यायचे. आता गर्दी वाढल्याची माहिती सिव्हिल चौकातील फाइन आर्टचे जावेद शेख यांनी सांगितले. एक फॅन्सी नंबरप्लेट तयार करून दिल्यानंतर पाचशे रुपये मिळायचे. दोन -तीन प्लेट तयार करून देणे काय आता सत्तर नंबर प्लेट देणे काय, तेवढेच काम असल्याचे ते सांगतात.
अगोदर जागृती; नंतर कारवाई
- शहरात वाहनांना बेशिस्तपणा आला होता. कारवाईमुळे नागरिकांत शिस्त येतेय ही चांगली बाब आहे. काल सायंकाळी माझी गाडी पकडली. सोमवारी दिवसभर गाडी सोडवण्यात माझा वेळ गेला. पोलिसांनी अगोदर जागृती करावी. त्यानंतर कारवाई करावी.
बादशहा शेख, नागरिक
ही कागदपत्रे जवळ बाळगा
वाहन परवाना, पीयूसी, वाहन विमा, दोन्ही आरसे पाहिजेत, फॅन्सी नंबर प्लेट नको, मोबाइलवर बोलू नका, ट्रीपल सीट जाऊ नका.
आठ जूनपासून नियम तोडणाऱ्या रिक्षांवर कारवाई मोहीम
रस्त्यावर रिक्षा नेताना रस्त्याच्या डाव्या लेनमधून जावे. तीनपेक्षा अिधक प्रवासी रिक्षात घेऊ नयेत. कोणत्याही चौकात अथवा सिग्नल चौकात पन्नास मीटरपर्यंत रिक्षा थांबवू नये. वाहतुकीला अडथळा होईल असा थांबा घेऊ नये अशा सर्व नियमांचे आपण पालन करावे. अथवा आठ जूनपासून असे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
पीयूसी, विमा कार्यालयात गर्दी
कारवाईच्या भीतीमुळे सोमवारी शहरात पीयूसी काढण्याकरता गर्दी होत आहे. दुचाकीकरता चाळीस रुपये खर्च आहे. वाहन विमा उतरवण्यासाठी अकराशे ते बाराशे रुपये खर्च अपेक्षित आहे. (वर्षाकाठी). गाडी नवीन घेतल्यानंतर सुरुवातीला कंपनीकडून विमा असतो. नंतर अनेकजण विमाच घेत नाहीत. गाडी पकडल्यानंतर विमा उतरवण्याकरता नागरिकांच्या कार्यालयात चकरा वाढल्या आहेत.