आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आधार' साठी पैसे, एकजण ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दमाणी नगर येथील महा-ई-सेवा केंद्रात आधार कार्ड नोंदणी करण्यास पैसे घेताना ऑपरेटर सुधीर भैरवाडी यास ताब्यात घेण्यात आले मशीन जप्त करण्यात आली. आधार नोंदणी करण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेत आहेत, अशा तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या होत्या. त्यानुसार ज्याठिकाणी आधार नोंदणी सुरू अाहे तेथे छापा टाकण्यात आला. शनिवारी सायंकाळी दमाणी नगर येथील महा-ई-सेवा केंद्रात प्रकल्प अधिकारी रिझवान मुल्ला यांनी छापा टाकला. आधार नोंदणी करणाऱ्या सुधीर भैरवाडी या आॅपरेटरला पैसे घेताना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी संबंधित महा-ई-सेवा केंद्र चालकाला नोटीस देण्यात येणार आहे. यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, शहरात आधार कार्ड काढण्यासाठी पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
बातम्या आणखी आहेत...