आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्ड पद्धतीत लागेल उमेदवाराचा कस, अध्यक्ष म्हणतात, पक्षास होईल फायदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आगामी महापालिका निवडणुका एक वॉर्ड, एक नगरसेवक या पद्धतीने घेण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.

सध्या ५१ प्रभाग आहेत. त्याऐवजी १०२ किंवा लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता जास्त वॉर्ड अस्तित्वात येतील. प्रभाग पद्धतीत विकासात दोन नगरसेवकांत समन्वयाअभावी अडसर येत होता, तो दूर होईल. वॉर्ड राहिल्याने एका नगरसेवकाला तेथे कामे करणे अधिक सोपे जाईल. शिवाय राजकीय लाभ आमच्याच पक्षाला मिळेल, असा दावा सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

यापूर्वीदोनवेळा प्रभाग पद्धत
२००२मध्ये प्रथम त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेतल्या. यात अपक्षांची संधी मिळाली नाही. गंगूबाई गायकवाड यांचा अपवाद वगळता अन्य छोटे पक्ष किंवा अपक्ष नगरसेवकांना निवडून येणे जमले नाही. २०११ मध्ये द्विसदस्य पद्धतीने निवडणुका झाल्या. त्यात फक्त एक अपक्ष निवडून आला.

छोट्या पक्षांना फायदा
-वाॅर्डपद्धतीमुळे होणाऱ्या निवडणुकीत छाेट्या पक्षांना जास्त प्रमाणात फायदा होईल. असा सगळीकडचा अनुभव आहे. गेल्या निवडणुकीत प्रभाग पद्धतीमुळे छोट्या पक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी वाॅर्डपद्धत ही भूमिका ठाम ठेवावी. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना यामुळे नक्कीच फायदा होईल.” राजासरवदे, प्रदेशसरचिटणीस, िरपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)प्रभागातसमन्वय नव्हता

-विकासातीलअडचण दूर होईल प्रभागामध्ये दोन नगरसेवक असल्याने त्यांच्यात समन्वय नसल्याचा परिणाम विकासावर होत होता. कामे होत नव्हती. नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या होत्या. वॉर्ड पद्धत आली तर एका नगरसेवकाला या छोट्या वॉर्डात कामे करणे सोयीचे होईल. वॉर्ड पद्धतच चांगली आहे. तशी निवडणूक झाली तर शिवसेनेला ती सोपीच जाईल. जो सक्षम उमेदवार असेल तो निवडून येईल.” प्रतापचव्हाण, शहरप्रमुख, शिवसेना

सर्वांनासोबत घेणार
-प्रभागरचना बदलून वॉर्ड रचना करण्यात येणार असल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आमच्या पक्षाला खूप फायदा होईल. वॉर्ड रचना ही एमआयएमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरणार आहे. आम्ही तर सर्वधर्मीय, समाजबांधवांना सोबत घेऊन जास्तीत जास्त जागा लढवणार आहोत. आता तर वॉर्ड रचना असल्यामुळे आमचे काम अधिक सोपे होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन आम्ही जास्त जागा निवडून आणू आणि येत्या निवडणुकीनंतर महापालिकेत निश्चित वेगळे चित्र निर्माण करू.” तौफिकशेख, प्रभारी,ऑल इंडिया मजिलिस इत्तेहादूल मुस्लिमिन

उमेदवारास महत्त्व येईल
-फारसाफरक पडणार नाही. प्रभाग पद्धतीमध्ये एखादा तगडा उमेदवार कमकुवत उमेदवाराला सोबत घेऊन जिंकू शकत होता, पण आता वॉर्ड झाला तर प्रत्येकाचा कस लागेल. ज्यांचे वॉर्डात काम आहे, लोकसंपर्क आहे त्याला जिंकता येणे थोडेसे सोपे जाईल. एमआयएम असो किंवा अन्य कोणताही पक्ष, ज्यांचा उमेदवार चांगला असेल तो निवडून येईल. त्यामुळे वॉर्ड झाल्याने फारसा काही वेगळा परिणाम होईल किंवा एमआयएम फॅक्टर वेगळे काही घडवेल असे वाटत नाही. वॉर्ड पध्दतीमध्ये उमेदवाराला फार महत्त्व असते.” यू.एन. बेरिया, अभ्यासूनगरसेवक, काँग्रेस

सच्च्याकार्यकर्त्यांना संधी
-प्रभागरचनेपेक्षावॉर्ड रचना शहराच्या विकासाला पोषक ठरली आहे. कार्यकर्त्याबरोबरच पक्षाला हिताची आहे. या पद्धतीने निवडणुका झाल्यास पक्षाचा व्यापक प्रसार प्रचार होण्यासाठी, प्रत्येक नागरिकांपर्यंत, प्रत्येक घरामध्ये पक्ष पोहोचण्यास मदत होते. शिवाय, यामध्ये कोणतीही राजकीय खेळी करून कोणालाही निवडून येण्याची संधी नाही. वॉर्डरचेनचा पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून स्वागत करतो.” मनोहरसपाटे, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस