आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांनी केली विनंती, ‘आमच्या पाटीचा वापर मटक्यासाठी नको’, विद्यार्थ्यांनी दिले पोलिसांना निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिकण्यासाठीआम्ही पाटीचा वापर करतो. त्याच पाटीचा उपयोग टपऱ्यावर मटक्यांचे आकडे लिहिण्यासाठी केला जातो. पाटीवर मटक्यांचे आकडे लिहिले जातात हा शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी कलंकच म्हणावा लागेल. हे पाहून आमच्या भावना दुखत आहेत. त्यामुळे पाटीचा हा दुरुपयोग रोखावा, अशी मागणी करणारे निवेदन मूव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टिस या संस्थेने पोलिस उपायुक्त निलेश अष्टेकर यांना देण्यात आले.

यावेळी शोएब मंगलगिरी, वाजीद गालीब, तोहिद शेख, याह्या आळंदकर, उजेफा शेख, अहमद शेख यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. पाटीचा दुरुपयोग बंद करून पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी बालदनिाचे औचित्य साधून हे निवेदन देण्यात आले.

शाळेच्या पाटीचा उपयोग मटक्यांचे आकडे लिहिण्यासाठी करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी बालदनिाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पोलिस उपायुक्त नीलेश अष्टेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.