आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Success Of The Invention Festival Solapur University

आविष्कार महोत्सवात सोलापूर विद्यापीठाचे यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या आठव्या राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात सोलापूर विद्यापीठाने चार पारितोषिके पटकावून खणखणीत यश प्राप्त केले.

विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये सर्व विजेत्या स्पर्धकांसह आविष्कार समन्वयक डॉ. एस.बी. महाडिक, संघ व्यवस्थापक डॉ. ए. एम.एस. रंगरेज यांचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांनी अभिनंदन करून सत्कार केला. डॉ. एस.बी. महाडिक यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रंगरेज यांनी आभार मानले. या वेळी कुलसचिव एस. के. माळी, बीसीयूडी संचालक डॉ. बी.एम. भांजे उपस्थित होते.

महोत्सवात राज्यातील एकूण 19 विद्यापीठांमधून 488 संशोधक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सोलापूर विद्यापीठातील 36 स्पर्धकांनी सहा विविध प्रवर्गातून सहभाग घेतला. मुंबई विद्यापीठाने सर्वाधिक पारितोषिके पटकावून प्रथम, उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापठाने द्वितीय तर सोलापूर विद्यापीठाने चार पारितोषिके पटकाविली व पुणे विद्यापीठासह संयुक्त तृतीय क्रमांक पटकाविला. संशोधनासारख्या महत्वाच्या स्पध्रेमध्र्ये स्पर्धक विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबाबत कुलगुरूंनी खास अभिनंदन केले.

यशस्वी स्पर्धक असे

सारिका सुरवसे, प्रथम क्रमांक (मानव्य विद्या, भाषा व ललित कला : पदवी गट)
सुप्रिया आवारे प्रथम क्रमांक, जैनाद्दिन मुल्ला द्वितीय क्रमांक : (वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र व विधीशाखा पदव्युत्तर गट)
आकाश गांधी द्वितीय क्रमांक (अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी गट)