आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रक-एसटी अपघातात १४ जण जखमी, एसटीच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या एसटीची बोरामणीहून सोलापूरकडे येणाऱ्या ट्रकशी समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही वाहने उलटली. ट्रक एसटी चालकासह १४ प्रवासी जखमी झाले. हा अपघात सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील हैदराबाद नाक्याच्या पुढे दीपक ट्रान्स्पोर्टजवळ मंगळवारी रात्री आठच्या सुमारास झाला.
सुप्रिता चंद्रय्या हिरेमठ (वय १०, रा. बिदर), परवीन चाँदशा विजापुरे (वय ३२, मोमीन गल्ली, उमरगा), मेघा बंडू रत्नपारखे, बंडू मधुकर रत्नपारखे (वय ३०, दोघे रा. सोलापूर), बसचालक दिनकर शिंदे (घोंगडेवस्ती, सोलापूर), भारताबाई भगवान स्वामी (वय ६०, रा. अणदूर, ता. तुळजापूर), मारुती पुजारी (वय ४४, रा. साठेपाटील वस्ती, सोलापूर), मंजुळा तुकाराम इंगळे (वय ३०, रा. नावदगी, ता. अक्कलकोट), जहीर चौधरी (वय ३०, रा. उमरगा), जगदेवी तिपण्णा बगूर (वय ४३, रा. बिदर) अशी जखमींची नावे आहेत.
सोलापूर-हैदराबाद एसटी (एमएच ०६- एस ८०८२) सोलापूर बसस्थानकावरून रात्री आठ वाजता हैदराबादकडे रवाना झाली. यात ७० प्रवासी होते. हैदराबाद नाक्यापुढील दीपक ट्रान्स्पोर्ट येथे ही एसटी आली असता समोरून येणाऱ्या दहाचाकी ट्रक (एमएच १३, एएक्स २७०७) यांच्यात समोरासमोर अपघात झाल्याने दोन्ही वाहने उलटली.
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता एसटी ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एसटीच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ट्रकमधील साहित्यही रस्त्यावर पडले होते. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
सिव्हिल चौकीत नोंद
एसटीतीलप्रवाशांना बाहेर पडण्यास अडचण येत होती. तेव्हा परिसरातील नागरिकांनी बसच्या खिडक्याच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. तसेच जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात १४ जण जखमी झाले तर ५० जणांना किरकोळ मार लागला. अपघाताची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...