आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॉकलेटच्‍या चवीचे अनोखे प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काही प्रमाणात चॉकलेट खाणे आरोग्याला हितकारक असल्याचे नवे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. युवक वर्गातही चॉकलेट खाणे मान्यता पावत आहे. चॉकलेट खाणे ही काही केवळ लहानग्यांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. युवा वर्गात चोखंदळपणे चॉकलेटला स्वीकारले जात आहे. याची पावतीच हॉटेल लोट्समध्ये आयोजित प्रदर्शनातून मिळाली.

आर चॉकलेटचे प्रदर्शन कंपनीचे संचालक रौनक शहा व चंदन शहा यांनी आयोजले होते. प्रारंभी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. र्शी. रासकर यांनी चॉकलेटच्या विविध फ्लेवरची चव घेऊन पसंतीची पावतीही दिली. ते म्हणाले, असे प्रदर्शन प्रथमच झाले. चॉकलेटच्या चवींशी नातेही जोडता आले.

सकाळी साडेदहापासूनच प्रदर्शन पाहण्यासाठी अनेकांची पावले हॉटेल लोट्सकडे वळाली. ही गर्दी रात्री आठपर्यंत कायम राहिली. अनलिमिटेड चॉकलेटची चव चाखणे आणि आवडलेली चॉकलेट मनमुराद खरेदी करणे याकडे सर्वांचा कल राहिला. निनाल शहा, राजन शहा, पराग शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

100 टक्के शाकाहारी ही विशेष ओळख
चॉकलेट खाणे आजकाल युवा वर्गात प्रचंड लोकप्रिय होत आहे. विविध चवींचे चॉकलेट या प्रदर्शनातून चाखता आले. आवडलेल्या चवींचे चॉकलेट्सही मी घेतले. माझ्यासाठी तर हे प्रदर्शन खूपच आगळेवेगळे वाटले. बहुदा सोलापुरात प्रथमच झाले. प्रिया चिमणचौडे, युवती

काही दिवसांतच सोलापूरकरांना रिटेल व होलसेल शॉपमधून आर चॉकलेटस खरेदी करता येऊ शकतील. हे चॉकलेट लाँच करण्यापूर्वी चोखंदळ ग्राहकांकडून चवीची पावती घेणे यासाठी आयोजित प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला रौनक शहा, संचालक, आर चॉकलेट्स

आहारात चॉकलेट खाण्याचे भारतीयांचे प्रमाण तसे कमी आहे. पाश्चात्यांमध्ये दैनंदिन खाण्यात विविध चॉकलेट्स असतात. अर्थात कॅलरीजचे प्रमाण तेथे लक्षात घेतले जाते. आर चॉकलेटच्या प्रदर्शनात आज भेट देता आली. चव आणि विविध फ्लेवर यांचे प्रकार जाणून घेता आले. डॉ. जगदीश बिराजदार, सुयोग नेत्रालय

चॉकलेटची चव सर्वात महत्त्वाची बाब असते. त्याचे सुंदर दिसणेही महत्त्वाचे असते व चॉकलेटी रंगही तितकाच महत्त्वाचा असतो. या वैशिष्ट्यांबरोबरच 100 टक्के व्हेजिटेरियन ही आर चॉकलेटची खासियत आहे. अपूर्वा शहा, संचालिका, आर चॉकलेटस

चॉकलेटचे प्रकार
पान मसाला, टुटी फ्रुटी, मिंट, मँगो क्रकले, कॉफी चॉकलेटस, कोकोनट फिलिंग, बटरस्कॉच इन डार्क
चॉकलेट, ड्राय फ्रूट, फिलिंग चॉकलेट. किंमत अगदी पंधरा रुपयांपासून ते चारशे रुपयांच्या स्पेशल पॅकिंगमध्ये.

हॉटेल लोटस येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या चॉकलेट प्रदर्शनात शहरातील अनेकांनी सकाळपासूनच गर्दी केली. अनेकांनी आवडीच्या चॉकलेटस्चा मनमुराद आनंद लुटला. अनेकांनी या प्रदर्शनाचा सहकुटुंब आनंद लुटला.