आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर पोलिस डायरी: तरुणीची सोनसाखळी लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर मैत्रिणीसोबत मुरारजी पेठेकडे पायी चालत जाणार्‍या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी चोरून नेली. अवंतीनगर परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. परिमिता प्रकाश पुकाळे (वय 20, उमा नगरी, मुरारजी पेठ) हिने फिर्याद दिली आहे. परिमिता ही आपल्या मैत्रिणीसोबत अवंतीनगरहून मुरारजी पेठेकडे जात होती. तेव्हा अचानक दोन तरुण मोटारसायकलवरून आले, त्यातील एकाने समोरून येऊन गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. सोनसाखळी 25 हजारांची होती.

गळफास घेऊन आत्महत्या
घरासमोरील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजी शंकर कांबळे (वय 55, रा. मड्डी वस्ती) असे मृताचे नाव आहे. सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येच कारण स्पष्ट झालेले नाही.

कचर्‍यावरून मारहाण
घरासमोर कचरा का टाकला, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला तीन महिलांनी मिळून मारहाण केली. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत रार्जशी विठ्ठल जक्कल यांनी फिर्याद दिली आहे. सलीमा भंडाले यांनी जक्कल यांच्या घराकडे कचरा ढकलला. याबाबत विचारणा केल्यास सलीमासह हलीमा भंडाले, वहिदा भंडाले (सर्व रा. समाचार चौक) या तिघींनी मारहाण केली.