आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवा लागल्याने दचकला, कॅमेऱ्यास घाबरून पळाला, चोर सीसीटीव्हीत कैद, चोरी टळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सीसीटीव्हीत कैद झाला चेहरा. )
सोलापूर- संगमेश्वर महाविद्यालयाच्या रस्त्यावर असलेल्या मोंढे अॅटोमोबाइल शोरूममध्ये चोर शिरला. त्याच्या हालचालीमुळे दिवा लागला. अचानक लागलेल्या दिव्यामुळे तो दचकला आणि इकडेतकिडे पाहू लागला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा रोख आपल्याकडे असल्याचे पाहताच तो चपापला आणि धूम ठोकली. प्रभावी सुरक्षा यंत्रणेमुळे चोराला काढता पाय घेण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि चोरीचा प्रकार टळला. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमाराला घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मालक पवन मोंढे यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. जुना एप्लॉयमेंट चौकाजवळ त्यांचे बुलेट, यामाहा दुचाकीचे शोरूम आहे. मागील शटरचे कुलूप उचकटून चोर आत शिरला. विष्णू मोंढे यांच्या दालनात आल्यानंतर तो थेट पैसे ठेवण्याच्या कपाटाकडे गेला. त्यावेळी लाल दिवा लागला. पुन्हा तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना एका कपाटाला हात लागला आणि िदवा लागला. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर नजर गेली आणि तो घाबरून केबीनमधून बाहेर पडला. हा संपूर्ण घटनाक्रम पंधरा मिनिटांचा आहे. तो सीसीटीव्ही यंत्रणेत कैद झालेला आहे.
टेबलच्या ड्राॅवरमध्ये पंधराशे रुपये आणि सहा मोबाइल होते. चोराने त्याला हात लावला नाही. सुरक्षा रक्षकाला शटरला कुलूप नसल्याचे पहाटे पाचला लक्षात आले. सकाळी साडेआठच्या सुमाराला मोंढे आल्यानंतर कुलूप नसल्याचे दिसताच चोरीचा संशय बळावला. पाहणी केल्यानंतर पोलिसांना माहिती दिली.

असा आहे चोरीचा घटनाक्रम...
३.३५ मिनिटेसेकंदांनी चोराला सीसीटीव्ही दिसला, लाइट बंद-चालू झाल्यामुळे घाबरला
३.४०चोरटाबाहेर पडला. मोबाइलची बॅटरी बंद करून खिशात मोबाइल ठेवला
३.२६ च्यासुमाराला शटरचा कुलूप कोयंडा उचकटला
३.२९लामोबाइल बॅटरी मारत वर आला
३.३२मिनीट-२० सेकंदांनी कपाटांची तपासणी सुरू केली
३.३४लाविष्णू मोंढे यांच्या केबीनमधील कपाटांची तपासणी सुरू
शोरूममध्ये शिरलेल्या चोराने या ड्रॉवरची चाचपणी केली.

फेब्रुवारीपासून मोहीम सुरू करणार
-सोसायटी,कॉलनी येथे सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक यासाठी नागरिकांशी संवाद साधणार आहोत. ही मोहीम फेब्रुवारीपासून सुरू होईल. एमआयडीसी, विजापूर नाका, फौजदार चावडी हद्दीत तसे नियोजन केले आहे. सुरक्षा यंत्रणा लावण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेऊ. याबाबत चर्चा होणार आहे. मोंढे यांच्या दुकानातील फूटेजच्या आधारे तपास करण्यात येईल. सुरक्षा यंत्रणेमुळे चोरी टळली.” सुभाषबुरसे, पोलिस उपायुक्त

पवन मोंढे सुरक्षा यंत्रणेबाबत म्हणतात
सुरक्षायंत्रणा आमच्याकडे सक्षम आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. संवेकदला (सेन्सार) आपला स्पर्श झाला की आलार्म वाजतो. मोबाइलच्या माध्यमातून दुकान, घरात निगराणी करता येते. चोरटा आल्यास (किमान दहा मोबाइलला कॉल जातो, तीन वेळा व्हाइस मेसेज जातो. दुकानातील काच व्हायब्रटर, मोशन डिटेक्टर अलर्ट आहे. वॉचमनसाठीही खास यंत्रे आहेत. मोंढे यांनी आपल्या शोरूममध्ये ही यंत्रणा विकसित केली असून विक्रीस आहेत.

चित्रफितपाहून शोध घेण्यात येईल
-मोंढेयांनी आपल्याकडे चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून चोराचा शोध घेऊ. तोे कुठला आहे, कोण आहे. रेकॉर्ड काढून तपास करू. मी फूटेजही पाहिले आहे. नागरिकांनीही सुरक्षा यंत्रणा दुकान, घरात बसवून घ्यावी.” मोहनशिंदे, पोलिस निरीक्षक, सदर बझार