आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेरेसवर झोपणे पडले महागात,चोरांनी लंपास केले 17 तोळे सोने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शेळगी परिसरात मंगळवारी बाराच्या सुमाराला वीज गेली. उकाड्यामुळे सुरुवातीला वडील टेरेसवर झोपण्यास गेले. लहान मुलगी रडू लागल्यामुळे साडेबाराच्या सुमाराला पत्नी, आई मुलीसह तेही झोपण्यास टेरेसवर गेले अन् साडेपाच तासांत चोरांनी सतरा तोळे दागिन्यांवर डल्ला मारला.
ही आपत्ती आली आहे शिवशरण पट्टण (रा. वरद नगर, शेळगी) यांच्यावर. ते बुलेट दुचाकी मेकॅनिक आहेत. जोडभावी पोलिसात त्यांनी बुधवारी दुपारी फिर्याद दिली आहे. मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पाच यावेळेत ही घटना घडली. असाच प्रकार हत्तुरे वस्तीत मागील महिन्यात घडला होता. म्हणजे, मध्यरात्री मुलगा आजारी पडल्यामुळे त्याला रुग्णालयात नेऊन तासाभरात घरी आल्यानंतर पंधरा तोळे दागिने चोरीला गेले होते.

ठसे मिळालेत

श्वान चाकोते नगरपर्यंत जाऊन थांबले. कपाटावर दोन ठसे मिळालेत. त्या रेकॉर्डवरून तपास करू. वीज गेल्यामुळे घरातील सर्वजण टेरेसवर झोपण्यास गेले. अवघ्या पाच तासांत चोरांनी आपला डाव साधला. कपाटाच्या चाव्या घरातच होत्या. त्याच्याने कपाट उघडले. कोणीतरी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे.” जयवंत खाडे, पोलिस निरीक्षक

हे दागिने चोरीला गेले

पाचतोळे पाटल्या, सात तोळ्यांचे प्रत्येकी साडेतीन तोळे दोन गंठण, दोन तोळे लॉकेट, अर्धा तोळे अंगठी, एक तोळे अंगठी, दीड तोळे कानातील रिंगा, झुबे असे एकूण सतरा तोळे. दीड किलो चांदी यात ताट, पंचारती, कळस, कुंकू वाटी. महागडा मोबाइल, पंधरा हजार रुपये रोख.