आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कार्डने व्यापाऱ्याचे लाख लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेस्टेशन परिसरातील जनरल स्टोर्सचे व्यापारी बेहराम इराणी (रा. विजय अर्पाटमेंट, रेल्वेलाईन ) यांच्या एटीमएम कार्डाचा वापर करून दोन लाख तीस हजार रुपये काढून घेतले.
मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. इराणी यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पार्क चौकातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरमधून हे पैसे काढले आहेत.

सव्वीस जून ते पाच जुलै या दरम्यान हे पैसे वेळोवेळी काढण्यात आले आहे. सुभाष चौकातील बँक आॅफ इंडिया शाखेत त्यांचे खाते आहे. इराणी यांचे खाते जॉइंट आहे. नेमके पैसे कोणी, कसे काढून घेतले याची माहिती घेत आहोत. बँकेकडूनही माहिती घेण्यात येत आहे. तपासात नेमका प्रकार पुढे येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल कोळी यांनी सांगितले.

हब्बूवस्तीत चोरी
घराचादरवाजा उघडा ठेवून हब्बू वस्तीत धुणीभांडी करण्यासाठी गेल्यानंतर चोराने अर्धा तोळे बोरमाळ, चार हजार रुपये चोरून नेल्याची घटना मंग़ळवारी उघडकीस आली. भाग्यश्री थिटे (रा. हब्बू वस्ती) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमाराला घडली.