आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला रोखूया घरफोड्या, पोलिस आणि एकमेकांच्या मदतीने...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महागडेबंगले बांधले जात आहेत. घरात किमती वस्तूंची खरेदीही होते. परंतु त्याच्या सुरक्षेची काळजी म्हणावी तशी घेतली जात नाही. त्यामुळेच चोरांचे फावते अन् आपण नंतर पश्चाताप करत बसतो. पन्नास लाखांचा बंगला असतो अन् शंभर रुपयांचा कडीकोयंडा लावतो. सुरक्षा रक्षक नेमत नाही. तीस-चाळीस हजारांचा मोबाइल घेतो पण त्याच किमतीत सीसीटीव्ही, अलार्म यंत्रणा लावत नाही. ही स्थिती बदलण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे.

सकाळ, दुपारच्या सत्रात काही तरुण शहरातील सोसायट्या आणि कॉलन्यांमध्ये फिरतात. बंद घरांची टेहळणी करतात. रात्री घरात दिवा दिसला नाही की मध्यरात्री अथवा पहाटे चोरी होते. जुना होटगी नाका परिसरातील डॉ. जे. बी. ठाकर यांच्या घरातून पंचावन्न तोळे सोन्याचे पावणेदोन किलो चांदीचे दागिने, ८० हजार रुपये चोरीस गेले. किनारा हॉटेलजवळ रिक्षातून प्रवास करताना २९ तोळे दागिने पळवले. माजी महापौर भीमराव जाधव यांच्या घरातून ७५ तोळे लुटण्याची घटना ताजी आहे.
कम्युनिटीपोलिसिंगमुळे गुन्हेगारीवर येईल नियंत्रण
पोलिसआणि नागरिक यांच्यातील सुसंवाद कमी झाला आहे. मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी सदस्य फक्त बैठकीपुरतेच उरले आहेत. पोलिस आणि नागरिक यांच्यातील दरी वाढल्यामुळे पोलिस तपासात नागरिकांचा सहभाग मिळत नाही. कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून काम केल्यास समाजातील घडामोडींची माहिती नागरिकांना तत्काळ मिळेल. गुन्हेगारीवर नियंत्रण येण्यास मदत होईल.
जी जी सेवेवर उपलब्ध , तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ३० सेकंद व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय, ऑटोमेटिक रेकॉर्डिंगला लावू शकता. पाहिजे तेव्हा चेक करू शकता. घरातील घडामोडी कळतात .
मुंबई शहर उपनगरातील प्रत्येक सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले. घरकामासाठी कर्मचारी नेमताना त्याच्याकडून ओळखीचा पुरवा घेण्यात येतोच. त्याबाबतची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये देण्यात येते. तसेच, वैयक्तिक सुरक्षेच्या उपाययोजना तेथील लोकांनी आपणहून केल्या आहेत. त्यामुळे चोरी, घरफोडी झाल्यास त्या चित्रीकरणाच्या मदतीने तत्काळ चोरास पकडण्यात येते. त्यामुळे मुंबईतील घरफोड्या जवळपास थांबल्या असून रस्त्यावरील चोऱ्या सुरूच आहेत. तसेच, ज्वेलरी दुकानांवर दरोड्याचे प्रकारात वाढ झाली असून त्या दुकानदारांनाही सीसीटीव्हा कॅमेरे सक्तीचे केलेत.
व्हिडिओ डोअर फोन
व्हिडिओडोअर फोन ही सिस्टिम असलेल्या बंगल्याबाहेर एक फोन आणि बंगल्याच्या आत एक फोन असतो. आतील फोनवर एक स्क्रिन असते. कॅमेऱ्यामुळे फोनवर बाहेरील व्यक्ती िदसते. तिच्याशी बोलताही येते.

प्रकारचे सीसीटीव्ही
सीसीटीव्हीकॅमेरे हे डोम (२२०० ते २८०० रुपये प्रती कॅमेरा), बुलेट (तीन ते चार हजार रुपये प्रती कॅमेरा) आणि पीटीझेड (चाळीस हजारांपासून ते दीड लाखापर्यंत प्रती कॅमेरा) या तीन प्रकारांत उपलब्ध आहेत.

आरोपी पकडण्यात मदत
सीसीटीव्हीकॅमेरे, व्हिडिओ डोअर फोन आदीमुळे चोरी करणाऱ्यांचे चेहरे कैद होतात. यामुळे पोलिसांना आरोपी पकडण्यास मदत होते आणि मोबाइलसेवेमुळे आपण तत्काळ चोरांना पकडू शकतो.

घराबाहेर कोणी आला तर दरवाजा उघडता आधी फोनच्या स्क्रीनवर त्याचा चेहरा पाहता येतो. बाहेरील फोनद्वारे त्याच्या बोलताही येते. यामुळे सभाव्य चोरी टळू शकते.

चोऱ्या आणि घरफोड्या ही केवळ सोलापूरची समस्या नाही. राज्यातील छोट्या-मोठ्या शहरांमध्ये या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. काही प्रमुख शहरांत पोलिसांनी राबवलेल्या उपाययोजनांबद्दल...
१,३०,००० अॅटॅच होम सिक्युरिटी अॅप्स
चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला तर अलार्म असल्यास मोठा आवाज होतो. त्यामुळे आजुबाजूच्या लोकांना मदतीसाठी तत्काळ धावून येणे शक्य होते.
अलार्म आदी उपकरणे लावली नसतील तर चोऱ्या रोखणे अवघड बनून जाते.