आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसाननगरात एक लाखाची घरफोडी, सकाळी आली उघडकीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अक्कलकोट रस्ता किसान नगर येथील राम लोखंडे यांच्या घरात चोरी झाली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीला आली. लोखंडे हे नातेवाइकांच्या लग्नाकरता हन्नूर येथे गेले होते. घरातील अन्य सदस्य बार्शीला गेले होते. बंद घराचा कुलूप-कोयंडा उचकटून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, पैसे असा एक लाखाचा ऐवज चोरीला गेला. एमआयडीसी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर तपास करत आहेत.

अपघातात तरुणाचा मृत्यू
हैदराबाद रस्ता, शांतीनगर झोपडपट्टी समोर सोमवारी सकाळी सहाच्या सुमाराला ट्रकच्या धडकेत चाळीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रस्ता ओलांडताना धडक बसल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख मंगळवारी सायंकाळपर्यंत पटली नव्हती. जेल रोड पोलिसात नोंद आहे.

जुळे सोलापुरात मुलाला पळवून नेले
जुळेसोलापुरातील विजय नगरात राहणारे उमाशंकर मोगलय्या जवळेकर यांच्या मुलाला पळवून नेण्यात आले आहे. ही घटना चोवीस जानेवारी रोजी घडली. वरुण जवळेकर (वय १४) या मुलाला पळवून नेण्यात आले असून विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. फौजदार चव्हाण तपास करत आहेत.