आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षातील सहप्रवाशांनी दागिने, पैसे पळवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कुंभारवेस ते शिवाजी चौक या दरम्यान रिक्षातून येताना सहप्रवाशांनी महादेवी शिवगुंडे (रा. आधार केअर सेंटर, भोगाव) यांच्या गळ्यातील खरबुजी मणी-माळ, मोबाइल, अडीचशे रुपये दोघांनी पळवले. ही घटना शिवाजी चौकात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला घडली. फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिवगुंडे या रिक्षातून येत होत्या. त्यांच्या रिक्षात आणखी दोन सहप्रवासी होते. रिक्षातून खाली उतरल्यानंतर दोघांनी जबरदस्तीने दागिने, पैसे काढून घेतले. साहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

दुकानातून अंगठी पळवली
लकी चौकातील आपटे ज्वेलर्स दुकानात अंगठी खरेदीच्या बहाण्याने एका तरुणाने चोरीचा प्रयत्न केला. महेश कदम (वय 25, रा. सांगवी काटी, तुळजापूर) याला अटक झाली आहे. संजय वेणेगुरकर यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. कदम याने दुकानात येऊन अंगठी खरेदीचा बहाणा केला. ती अंगठी पळवताना रंगेहाथ पकडले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

40 हजारांचा माल चोरीला
अक्कलकोट रस्ता एमआयडीसी येथील एका कारखान्यातून ड्रील मशीन, 56 पन्हाळी पत्रे चोरीस गेले आहेत. त्यांची किंमत 40 हजार रुपये आहे. सुनील कोळी यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही चोरी 31 जानेवारी रोजी घडली असून, मंगळवारी फिर्याद देण्यात आली आहे.

फलक लावल्याने गुन्हा
नई जिंदगी शांतिनगर रोड या ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता डिजिटल फलक लावल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिरोज पठाण यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी दहाच्या सुमाराला घडला. मालमत्ता विदुपीकरण कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. डिजिटल फलक कुणी लावला आहे, याचा शोध सुरू आहे.

जीवे मारण्याची धमकी
शेतजमिनीच्या कारणावरून कृष्णात गायकवाड (रा. तांदुळवाडी, सोलापूर) यांना दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी घडली असून, आज जेल रोड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. बब्रुवान चेंडके , राम सुरवसे (रा. दोघे काडगाव, तुळजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गायकवाड यांच्या मालकीची शेती महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण यांना विकणार आहेत. त्यावरून चेंडके व सुरवसे यांनी गायकवाड यांना मार्केट यार्डजवळ बोलावून घेऊन शेती विकण्यावरून अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली, दमदाटी केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

मंगळसूत्र चोरी करणार्‍या दोघा तरुणांना शिक्षा
सोलापूर 2 सात रस्ता परिसरात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणार्‍या दोघा तरुणांना न्यायदंडाधिकारी र्शीकांत भोसले यांनी एकवर्षे शिक्षा ठोठावली. हैदर नजीर शेख (वय 20), समीर नजीर शेख (वय 20, रा. दोघेजण विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) यांना शिक्षा झाली आहे. मंगल मडुरे (रा. मसिहा चौक ,मोदी) यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना 18 फेब्रुवारी 2013 रोजी घडली होती. सरकारतर्फे अल्पना कुलकर्णी, आरोपीतर्फे लोधा यांनी काम पाहिले.