आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thefts Continue In Solapur City, But Police Inactive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरांचा धुमाकूळ सुरूच, पोलिस मात्र निष्क्रियच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बाळे येथील गजानन पार्कमध्ये शिक्षकाच्या घरावर दरोडा, महावीर चौकात डॉक्टरच्या घरातून पंचावन्न तोळे दागिने पळवले, किनारा हॉटेलजवळ जाताना रिक्षातून २९ तोळे दागिने हातोहात लांबवले. या घटना विसरता येण्यासारख्या नाहीत. मागील दोन महिन्यांच्या काळात झालेल्या चो-यांची संख्याही भलीमोठी आहे. डिसेंबर २०१४ आणि जानेवारी २०१५ अशा दोन महिन्यातील ६० दिवसांत शहरातून सुमारे दीडशे तोळे दागिने चोरीला गेल्याची नोंद आहे. याशिवाय मोबाइल, लॅपटॉप, किरकोळ घरफोडी, चोरी अशा घटना वेगळ्याच आहेत. पोलिसांना चोर का सापडत नाहीत. पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभाग (डीबी पथक) आणि गुन्हे शााखा काय काम करते, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

चोरांचीरोजची सरासरी कमाई पन्नास हजारांच्या घरात
डिसेंबर२०१४ आणि जानेवारी २०१५ या दोन महिन्यातील ६० दिवसांत शहरातून सुमारे दीडशे तोळे दागिन्यांची चोरी झाली. म्हणजे महिन्याकाठी पंच्याहत्तर तोळे आणि दिवसाला सरासरी अडीच तोळे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण आहे. चालू बाजारभावाप्रमाणे अडीच तोळे दागिन्यांची किंमत किमान पन्नास ते साठ हजार रुपये आहे. म्हणजे एवढा ऐवज रोज चोरांचा हाती लागतो, असे दिसते. परंतु पोलिसांची कामगिरी मात्र सुस्त आहे.
चोरीच्या घटना
बाळे, गजानन पार्क, संदीप वेदपाठक यांच्या घरावर दरोडा, सात तोळे
महावीर चौक, डॉ. ठाकर यांच्या घरात ५५ तोळे
सैफुल - विनायक आमले यांच्या घरात दीड तोळे
नई जिंदगी सिध्देश्वर नगर, मजीद आलुरे यांच्या घरात तोळे दागिन्यांसह एक लाखाचा ऐवज
रेल्वे लाइन, बीसी होस्टेलमधील साधना कांबळे यांचे तीन तोळे
सराफ बाजार, अनिता चौधरी यांचे दोन तोळे
किनारा हॉटेलजवळ रिक्षातून जाताना मल्हारराव कुलकर्णी (रा. काडादी नगर, मूळ- गुलबर्गा) यांच्या पिशवीतून २९ तोळे
जुळे सोलापूर, आदित्य नगर, संतोष होदुळे यांच्या घरात दीड तोळे
जुबेर इनामदार यांच्या घरात दोन तोळे
भाग्योदय हाउसिंग सोसायटी, वीरपक्ष चलवादी यांच्या घरात तीन तोळे
पद्म नगर, डॉ. सिद्धलिंग पाटील यांच्या घरात सोने, चांदी दागिने (दोन लाख िकमतीचे)
अरविंद धाम, सुनीता कदम यांच्या घरी तोळे
भिमाशंकरनगर, सिकंदर इनामदार यांच्या घरात आठ तोळे
बसस्थानक ते रंगभवन रिक्षाप्रवासात शिवाजी सोलनकरांच्या पिशवीतून तीन तोळे
अष्टविनायक नगर अश्विनी शिंदे यांचे अडीच तोळे
रविवार पेठ, लक्ष्मी आरकाल यांचे दोन तोळे मंगळसूत्र
भवानी पेठ, रेणुका खानापुरे यांचे तोळे
बलीदान चौक, विद्या चव्हाण यांचे पाच तोळे
मीनाक्षी मडवळी यांचे एक तोळे मंगळसूत्र
विजापूर रस्ता जवान नगरात सुनीता हत्तरकीहाळ यांचे दीड तोळे मंगळूसत्र
आसरा चौकात सुलभा मठेकर यांचे अडीच तोळे गंठण
दत्त चौकात संतोष नेमवार यांच्या दुचाकी डिक्कीतून पाच तोळे
चांदणी चौकात महालक्ष्मी चिंचोरे यांचे अडीच तोळे गंठण
उत्कर्ष नगर येथील वासंती कुलकर्णी यांचे दीड तोळे गंठण.
आमचे पथक मागावर आहे
ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत चो-या होतात, त्यांचे डीबी पथक त्यावर काम करतेय. आमचे गुन्हे पथकही स्वतंत्र काम करतेय. मोठ्या गुन्ह्यात दोघेही संयुक्तपणे तपास करतोय. चोरांच्या मागावर आम्ही आहोत. चोरटे हाती लागले की अनेक गुन्ह्यांची उकल होईल. नीलेशअष्टेकर, पोलिस उपायुक्त