आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना हुलकावणी देऊन चोरांचे उद्योग सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात तपासणीसाठी पहाटे गुन्हे शाखेचे पोलिस पथक तैनात असते. पण, चोरटेही पोलिसांना हुलकावणी देऊन आपला डाव साधत आहेत.शहरातील सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्शल बीट पथक आहेत. ती पथके रात्रगस्त देतात. याशिवाय संपूर्ण शहरात पेट्रोलिंग, गस्तसाठी पस्तीस दुचाकी, तेरा चारचाकी वाहनांतून पोलिस अधिकारी, कर्मचारी गस्त देतात. चोरीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना काय आहेत, असे अधिकार्‍यांना विचारले की आमचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते.


तीन दिवसांपूर्वी जोडभावी हद्दीत नारळ व्यापार्‍याच्या घरात पंचवीस तोळे सोने, तर नाकोडा गृहनिर्माण सोसायटीत नऊ तोळे दागिन्यांची चोरी झाली. मागील आठवड्यात चव्हाण, अत्रे या मोबाइल शॉपी दुकानात चोरी, व्हीआयपी रस्त्यावरील वुडलँड शोरूममध्ये चोरी झाली. माजी महापौर भीमराव जाधव यांच्या घरात पासष्ट तोळे दागिने चोरीला गेले. या सर्व घटनांचा आढावा घेतल्यास घटनांची आकडेवारी वाढणारी आहे.


एकाही चोरीचा तपास नाही. चोर्‍या रोखण्यासाठी गस्त, नाकाबंदी, गस्तपथक असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगतात. मग चोर्‍या का थांबत नाहीत, चोर का सापडत नाहीत. दुसरीकडे ढिलाईसाठी पोलिस अधिकार्‍यांना जबाबदार धरले जात नाही.

पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांची काही निरीक्षणे
सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, भरपूर विद्युत दिवे नाहीत
घराचे कडीकोयंडा, लॉकर साध्या पद्धतीचे आहेत
दागिने, पैसे, लॉकर व बँकेत ठेवत नाहीत अथवा सोबत नेत नाहीत
परगावी जाताना दागिने, पैसे घरात ठेवतात
घरासमोरील दिवे रात्री बंदच असतात, त्यामुळे चोर अंधाराचा गैरफायदा घेतात.
सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही