आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘थीम पार्क’ची संकल्पना सोलापुरात साकारणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी ‘थीम पार्क’ उभारण्याचा संकल्प महापालिकेचा आहे. सोलापूर विद्यापीठजवळील महापालिकेच्या 46 एकर जागेत हे बांधले जाणार आहे.

सायन्स अँन्ड टेक्नालॉजी पार्क (पुणे)ने 100 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यात नऊ प्रकारच्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्याचे प्रात्यक्षिक महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कक्षात महापालिका अधिकारी आणि पदाधिकार्‍यांना दाखवण्यात आले.

दरवर्षी जिल्ह्यात सुमारे 76 लाख पर्यटक तीर्थक्षेत्रांना भेट देतात. येथे दोन दिवस राहण्याची त्यांची मानसिकता असते, अशी माहिती पार्कच्या पाहणीतून पुढे आली आहे. त्यांनी दोन महिने शहरात सर्वेक्षण केले. याचा फायदा शहराच्या आर्थिक उलाढालीत होईल असा अंदाज आहे.
हे होते बैठकीत

महापौर अलका राठोड, उपमहापौर हारून सय्यद, स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी, नगरसेविका फिरदोस पटेल, नगरसेवक आनंद चंदनशिवे, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पार्कचे आदित्य जाधव, विजेंद्र पाटील, सोनाली भट्टाचार्य, आदी.

प्रगती होईल
‘थीम पार्क’ची संकल्पना यशस्वी झाल्यास शहरात पर्यटक येतील. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढेल. पर्यटनाच्या बाबतीत पुढे जाईल. शहरात चांगले प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.’’ चंद्रकांत गुडेवार, महापालिका आयुक्त

पाच वर्षांत 780 कोटींचे उत्पन्न
‘थीम पार्क’ देशात नवीन संकल्पना असली तरी मार्केटिंग केल्यास ती यशस्वी होऊ शकते. 2017मध्ये पार्क सुरू झाल्यास सामान्यांना परवडेल असे किमान 200 रुपये आकारणी केली तर पुढील पाच वर्षांत 780 कोटी उत्पन्न मिळू शकते. यापैकी सुमारे 300 कोटी खर्च वजा जाता 480 कोटींचा फायदा पालिकेला होऊ शकतो, असे पार्कचे आर्थिक सल्लागार शेखर आगरकर यांनी सांगितले. तिकीट विक्री, भाडे, खाद्य, वस्तू विक्री आणि तेथे कंपन्यांकडून करण्यात येणारी जाहिरात हे उत्पन्नाचे स्रोत होतील.

अडीच वर्षांत होईल
100 कोटींचा आराखडा असून, यात तांत्रिक काम करावे लागणार आहे. तो सुरू होण्यास अडीच वर्षं लागण्याची शक्यता आहे.


दरवर्षी शहरात पर्यटक (अंदाजे संख्या लाखांत)
सोलापूर 22.50
तुळजापूर 14.50
पंढरपूर 18.50
अक्कलकोट 10
गाणगापूर 10

नऊ संकल्पना (कंसात खर्च कोटीत)
1. फाइव्ह डी फिचर : ही संकल्पना भारतात कोठे नाही, थ्रीडी पर्यंत आहे. (53.73)
2. स्वर्ग या नरक : संकल्पना मांडून दोन्हीत फरक दाखवण्याचा प्रयत्न. (510.77)
3. वाडा : जुन्या काळातील वाड्यात लोक कसे राहत होते. (58)
4. महाराष्ट्रातील र्शध्दास्थाने : शिर्डी, आळंदी, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, शेगाव आदी स्थळे. (517)
5. गडकोट : महाराष्ट्रातील किल्ले आदींचा समावेश. (59)
6. सिनेमा गृह : सुमारे दोन हजार लोक बसतील अशी व्यवस्था, व्यवसायासाठी म्हणून वापरता येईल. (58.70)
7. खेळांचे मैदान : लहान मुलांना खेळण्यासाठी अत्याधुनिक खेळणी. (55)
8. मार्केट : शहरातील नामवंत वस्तू ठेवता येतील, त्यामुळे उत्पन्न मिळेल. (53.73)
9. महाराष्ट्रातील गावे : यामुळे महाराष्ट्र दर्शन घडेल. (512.80)