आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिनी पुन्हा मंगळसूत्र चोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्वातंत्र्यदिनाची संधी साधत शहरातील विविध भागात बंद घरांना लक्ष्य करीत चोरट्यांनी साडेतीन तोळे दागिन्यांस लाखों रुपयांचा माल लंपास केला. बुधवार व गुरुवारी या दोन दिवसात चार ठिकाणी घरे फोडण्यात आली. जुळे सोलापूर, बाळे या हद्दवाढ भागात मागील काही दिवसांपासून चोरींच्या घटनेत वाढ झालेली आहे.

जुळे सोलापूर - गोविंदश्री मंगल कार्यालय ते शिवगंगानगर या मार्गावरून पायी जाताना श्रीमती कुलकर्णी यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी हिसका मारून पळवले. रवींद्र कुलकर्णी (रा. शिवगंगानगर, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. 13 ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमाराला ही घटना घडली. कुलकर्णी यांच्या आई घरी पायी जाताना मोटारसायकलवरून दोघे तरुण पाठीमागून येऊन गळ्यातील दागिने हिसकावून नेले.

दयानंद कॉलेज - स्टेट बँक कॉलनी, दयानंद कॉलेजवळ येथे राहणार्‍या दीपा विजयकुमार चंकेश्वर यांच्या घरात चोरी झाली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. दीड तोळ्याची सोनसाखळी, एक व अर्धा तोळे असे दोन सोन्याच्या अंगठय़ा, साडेपाच तोळे चांदीचे दागिने, पंधरा शालू, एक लाख रुपये असा एकूण दोन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. चंकेश्वर यांनी जुना कारंबा नाका येथील हरिपद्दम अपार्टमेंटमध्ये नवीन घर घेतल्यामुळे काही दिवस इकडे राहत होते. स्टेट बँक कॉलनीतील घर बंद असल्याची संधी साधून चोराने कडीकोयंडा तोडून सुमारे दोन लाखांचा ऐवज पळविला. जोडभावी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास जगताप तपास करीत आहेत.
रामलिंगनगर - विजापूर रस्त्यावरील रामलिंगनगरात राहणारे हसीना बेगम उस्मानअली गोलंदाज यांच्या घरात चोरी झाली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. नऊ ऑगस्टपासून घर बंद करून त्या माहेरी गेल्या होत्या. त्यादरम्यान चोराने घरातील किराणा साहित्य, घड्याळ, सात हजार रुपये असा ऐवज चोरीस गेला आहे. विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
बाळ्यातील जागृती कॉलनीत तीस हजारांची घरफोडी - बाळे येथील जागृती हौसिंग सोसायटीतील अभिजित कसबे यांच्या बंद घरात चोरी झाली आहे. आठ हजार रुपये व चांदीची दागिने असा 30 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ते घर बंद करून पुण्याला कामानिमित्त गेले होते. घरी आल्यानंतर कडीकोयंडा उचकटून कपाटातील चांदीचे दागिने व पैसे चोरल्याचे लक्षात आले. फौजदार चावडी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. तपास साहाय्यक फौजदार श्रीरंग सोलनकर तपास करीत आहेत.