आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चौक पोलिस चौकीसमोर एटीएम फोडण्याचा झाला प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अशोकचौक पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न शनविारी सकाळी साडेदहाच्या सुमाराला झाला. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. नागरिक आणि वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला. ताब्यात घेतलेला संशायित पोलिस रेकॉर्डवरचा असल्याचे सांगण्यात आले.
अॅक्सिस बंँॅकेचे अशोक चौकात एका गाळ्यात दोन एटीएम मशिन आहेत. त्यात सुमारे पन्नास लाख रुपये होते. दगड घालून एटीएम फोडताना एका नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकीत आणले. मशिनला दगडाने मारल्यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे जेल रोड पोलिसांनी सांगितले.
आशोक चौक पोलीस चौकी समोरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न शनविारी झाला. वाहतूक पोिलसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडण्यात यश आले.