आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, हॉटेल ध्रुवसमोर मोबाइल गॅलरी फोडताना सापडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बिहारमधून पेंटर म्हणून आलेल्या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मोबाइल गॅलरी फोडताना मुसक्या आवळल्या. मात्र सहा जण फरार झाले. रविवारी पहाटे डफरीन चौकातील हॉटेल ध्रुवसमोर हा सिनेस्टाइल थरार घडला.

शुक्रवारी सकाळी हे तरुण सोलापुरात आले. रेल्वे स्टेशनजवळील मनोज लॉजवर खोली घेतली. पेंटर असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी दिवसभर शहरातील काही दुकानांची रेकी केली. जुना एम्प्लॉयमेंट चौकातील ज्योती टेलिकॉम (सॅमसंग मोबाइल गॅलरी) दुकानात जाऊन पाहणी केली. शंका येऊ नये म्हणून मोबाइल विकत घेतले. मग रूमवर जाऊन डाव आखला. रविवारी पहाटे पाचच्या सुमाराला याच दुकानाचे शटर उचकटले. पेट्रोलिंग करणा-या पोलिसांनी चौकशी करताच चौघांनी धूम ठोकली. बाजूला थांबलेले इतर चौघेही पळाले. पोलिसांनी लगेच वायरलेसवरून नियंत्रण कक्षाला मेसेज देताच स्टेशन चौकीच्या पोलिसांनी भय्या चौकात दोघांना जेरबंद केले. अगदी सिनेस्टाइल हा थरार घडला. बिहारमधून पेंटर म्हणून आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले असाच हा प्रकार... अरमान उर्फ अस्लम जुगन दवन (वय ३०, रा. हसननगर, मोतीहारी,बिहार), अनिल देवेंद्र सिंह (वय २२, रा. दलताप, ता. डाका, मोतीहरी, बिहार) यांना अटक झाली आहे. न्यायालयाने एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दीड वर्षापूर्वी जुना एम्प्लॉयमेंट चौकातील (मॉर्डन प्रिटिंग प्रेस शेजारी) चव्हाण यांचे सॅमसंग मोबाइल दुकान फोडले होते. त्यात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. याशिवाय चार पुतळा परिसरातील अत्रे मोबाईल शॉपीही फोडल्याची कबुलीही याच टोळीने दिल्याचे पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले.
चोरांनी संधी साधताच पोलिसांचा भय्या चौकापर्यंत पाठलाग
ज्योती टेलिकॉम मोबाइल दुकान महेश चिंचोळी यांचे आहे. दुकानासमोर जाहीरात फलकही आहे. तो शटरच्या सेंटर लॉकसमोरच आहे. बिहारमधून आलेल्या टोळीने रविवारी पहाटे सेंटर लॉक तोडला. इतर चौघे बाजूला उभे होते. पेट्रोलिंग करणारे फौजदार चावडीचे पोलिस शिपाई अप्पासाहेब घोळवे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. वायरलेसवर मेसेज मिळताच रेल्वे स्टेशन चौकीचे पोलिस शिपाई लक्ष्मण खरात, महमद इसाक नदाफ दोघे भैय्या चौकात आले. तिथे जीपजवळ आठ तरूण थांबले होते. पोलिसांनी चौकशी करताना सहाजण पळाले. दोघांना पोलिसांनी पकडले. काही पोलिसांनी जणांचा पाठलाग केला. श्वानपथकही आले. ते दमाणीनगर, लक्ष्मी विष्णू मिल चाळ मैदानातून रिलायन्स मार्टजवळील मुख्य रस्त्यावर येऊन थांबले. जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र रात्रीपर्यंत आनंतकुमार साग, पवनकुमार दास, समीर दवन, शब्बीर दवन, समीम दुबे, मोमीन दवन (संत विहारी, ता.डाका, बिहार) हे सहाजण सापडले नव्हते.

पंचवीस लाखांचे मोबाइल
ज्योती टेलिकॉमचे महेश चिंचोळे म्हणतात, दुकानात बाराशेपासून साठहजार रुपयांपर्यंतचे सुमारे पंचवीस लाखांचे मोबाअल होते. सेंटर लॉक तोडले आहे. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांचा डाव फसला. सकाळी सातच्या सुमाराला पोलिसांनी माहिती दिली. फिंगर प्रिंट घेतले. श्वानपथक आले होते.