आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पट वाढला, आता संख्या टिकवण्यासाठी कसोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुलांच्या शिक्षण आणि गुणवत्तेपेक्षा शिक्षकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने मुले पटावर आणण्यासाठी गल्लीबोळात अनुदानित शैक्षणिक संस्थांसह पालिका शाळांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. महापालिका शाळेतील मुलांची संख्या यंदा ५७२१ इतकी झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १७०० मुलांची पटनोंदणी वाढली आहे. हा पट कायम टिकवण्यासाठी पालिका शाळेतील शिक्षकांना कसोटीला उतरावे लागणार आहे.
नोकरी टिकवण्यासाठी
काही संस्था सुविधांचे आमिष दाखवून मुलांचे पट वाढवत आहेत. अशा स्थितीत महापालिकेच्या ५९ शाळांतून विद्यार्थ्यांची संख्या २५ टक्के वाढली आहे. गेल्या वर्षात पटावर ४०२१ मुले होती, यंदा ५७२१ इतकी आहेत. या पटसंख्येपैकी पहिल्या दिवशी (१५ जून) शाळेत ४३८६ जणांची उपस्थिती होती. मुलांचा पट १७०० ने वाढला, पण पहिल्या दिवशी अनुपस्थित किमान १२ टक्के होते. पटावरील मुले नियमित शाळेत कसे येतील, याचे आव्हान महापालिकेतील शिक्षकांना स्वीकारावे लागणार आहे.
समाधानाची बाब
पालिकेच्या ३० शाळांमधून पहिली ते सातवी वर्गातील एकूण उपस्थिती ५० पेक्षा कमी होती. नवनवे शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या गुणवत्तेवर भर देण्यात येत असल्याने पालिकेच्या सात शाळांमध्ये पहिल्या दिवशी १०० पेक्षा अधिक विद्यार्थी होते. दुसरीकडे खासगी संस्थांमधील विद्यार्थी पट दोन वर्षांपासून कमी होतो आहे, त्या तुलनेत पालिकेचा पट वाढतो आहे.
पट सतराशेने वाढला
- दर्जात्मक शिक्षण देण्याच्या प्रयोगामुळे शिक्षकांमधील जागरूकतेने पालिका शाळांचा पट १७०० ने वाढला आहे. तो टिकवण्यासाठी शिकस्त केली जाईल. सामान्य मुलांचा शैक्षणिक स्तर उंचावणाऱ्यावर भर असेल.”
विष्णू कांबळे, प्रशासन अधिकारी, सोलापूर
खासगी शाळांमध्ये विद्यार्थी गळती
वर्ष२०१२-१३२०१३-१४२०१४-१५
1 ली ते 5 वी८८,७५४७३,१४९७०,०७८
तफावत0१५,६०५३,०७१
5 वी ते 8 वी४५,८१०४३,४९०४३,०२५
तफावत0२,३२००,४६५
एकूण विद्यार्थी१,३४,५६४१,१६,६३९१,१३,१०३
एकूण तफावत0१७,९२५३,५३६
बातम्या आणखी आहेत...