आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांमध्ये तीन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची कबुली मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी दिली.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील छावणी घोटाळ्यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला. 5 डिसेंबर 2012 रोजी 11 उपजिल्हाधिकारी यांच्या पथकांनी सांगोल्यातील छावण्यांवर धाडी टाकून केलेल्या तपासणीत एकाच दिवसांत 7 हजार जनावरे बोगस दाखवल्याचे उघडकीस आले होते. यातील बहुतांश छावण्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या होत्या. छावण्यांचे विश्वस्तपद सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे होते. राजकीय दबावापोटी घोटाळेबाज छावणी चालकांवर कारवाईस प्रशासन धजावत नव्हते. नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईला वेग आला आणि घोटाळेबाज छावण्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई न करता त्यांना तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड केल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी सभागृहात देऊन सांगोल्यात छावणी घोटाळा झाल्याची कबुली दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.