आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मृतदेहांची ओळख नाहीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दहिटणेजवळील एका शेतात सतरा जून रोजी झालेल्या तिहेरी खून प्रकरणातील एकाही मृतदेहाची ओळख अद्यापपर्यंत पटली नाही. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, विजापूर, गुलबर्गा, आंध्रप्रदेश सीमावर्ती भाग या ठिकाणच्या प्रत्येक पोलिस ठाण्यात जाऊन मिसींग केस, अपहरण केसमधील तरुणांची, मुलांची माहिती घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासात हे तीनही मृतदेह सोलापुरातील नसल्याचा निष्कर्ष काढल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या शहरातील हे खूनप्रकरण उघडकीस येण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे पोलिसांनाही याचा तपास करण्यासाठी आवाहनच आहे.

सध्या एक पथक झारखंड शहरात तपास करीत आहे. पोलिसांनी या सर्व बाबींची पडताळणी केली आहे. मृतदेहांचे फोटो व पत्रक तयार करून बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणी डकविली आहेत. तपास सुरू असून लवकरच घटनेचा उलगडा होईल, असे पोलिस निरीक्षक के. एस. धांडेकर यांनी सांगितले.