आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लिनिकमधील चोरी उघड; तीन महिला चोरांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दातदुखत असल्याचा बहाणा करून दाजीपेठेतील माय डेंटल क्लिनिकमधील डॉ. सौ. सय्यदमिरावा कादरी यांच्या पर्समधून सात तोळे दागिने लंपास केल्याप्रकरणी तीन महिलांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. महिलांकडून दीड तोळे सोने जप्त केले आहे. दातदुखीचा बहाणा करून तीन महिला नोव्हेंबर रोजी डॉ. कादरी यांच्याकडे आल्या होत्या.
या वेळी दोघींनी त्यांना बोलण्यात गुंतवत दागिने पळवले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना जेरबंद केले आहे. लक्ष्मी शिवाजी भोसले (वय २५, रा. साईनगर, आसारामबापू आश्रम शाळेजवळ, अक्कलकोट रस्ता), पद्मिनी शिवाजी भोसले (वय २०, रा. बिस्मिल्लानगर, मुळेगाव रोड), ममता संभाजी भोसले (वय २०, रा. बिस्मिल्लानगर) या तिघांना अटक झाली आहे. सोमवारी त्यांना न्यायाधीश ए.बी. कुरणे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली.

अशोक चौकात फिरत होत्या
रविवारीसायंकाळी तिघीजणी अशोक चौकातील डॉ. गायकवाड यांच्या हॉस्पिटलसमोर फिरत होत्या. त्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना मिळाली. पथकासह गेल्यानंतर त्या पळून जाऊ लागल्या. ताब्यात घेऊन चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. यापूर्वी डॉ. शीला पटवर्धन यांच्या रुग्णालयात चोरी केल्याचे समोर आले आहे. शक्यतो महिला डॉक्टरांच्या ओपीडीत त्या हा प्रकार करतात. नजर चुकवून पैसे, दागिने पळवतात, असे पोलिसांनी सांगितले.
रेकॉर्डचीमाहिती काढतोय
डॉ.कादरी यांच्या रुग्णालयात झालेल्या चोरी प्रकरणी तिघांना अटक झाली असून, त्यांचा मागील रेकॉर्ड तपासण्यात येत आहे. तपासात आणखी काही बाबी समोर येतील. विजापूर नाका हद्दीत मध्यरात्री वाढीव पाच दुचाकीवरून पोलिसांची गस्त वाढविली आहे. नीलेश अष्टेकर, पोलिस उपायुक्त