आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉल्बी बंद करण्यासाठी गेलेल्या फौजदारासह पोलिसांवर दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डोणगावरस्त्यावरील वानकर फार्म हाऊसमध्ये मंगळवारी मध्यरात्री दोननंतर सुरू असलेला डॉल्बी बंद करण्यासाठी गेलेल्या सलगर वस्ती पोलिसांवर १० ते २० तरुणांनी दगड, काठीच्या साहाय्याने हल्ला केला. यात एका फौजदारासह सात जण जखमी झाले. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली अाहे.
अक्षय चंद्रकांत वानकर यांच्या वाढदिवसानिमित्त वानकर फार्म हाऊसवर कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये डॉल्बीचा जोर होता. वानकर परिवारातील मंडळी दहाच्या सुमाराला फार्म हाऊसवरून उर्वरितपान १२
घरीगेली. त्यानंतर याठिकाणी सुमारे २० तरुण थांबले आणि ते मध्यरात्रीनंतर डॉल्बीच्या तालावर गोंधळ घालत होते. यादरम्यान सलगरवस्ती पोलिस ठाण्याचे फौजदार विश्वास भांबड गस्तीवर होते. सलगरवाडीजवळील बुवा कॅन्टीनजवळ त्यांना अक्षता पाम्प्ससमोरील वानकर फार्म हाऊसमध्ये डॉल्वीचा दणदणाट सुरू असल्याचे लक्षात आले. तिथे जाऊन पाहिले असता २०-२५ तरुण मुले गाण्यावर नाचत होती.
प्रथम हुज्जत घातली नंतर काठीने मारहाण
फौजदार भांबड यांनी तरुणांना डॉल्बी बंद करण्यास सांगितले. मात्र ही मंडळी त्यांच्याशी हुज्जत घालू लागली. पोलिसांनी जादा कुमक मागवून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी उलट पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी पोलिस कर्मचाऱ्यांना लाठीने मारहाण केली. नियंत्रण कक्षाकडून आणखी पोलिस, कमांडो पथक मागवले. त्यानंतर पोलिस आणि तरुणांमध्ये झटापट, पळापळ झाली. दहाजणांना अटक करण्यात आली असून, आणखी १५-२० तरुण पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या तरुणांना झाली अटक
नीलेश संजय काटकर (वय २०), सूरज रमेश पवार (वय २२), गणेश मोहन पवार (वय २०), तुषार बंडोबा पवार (वय २०), आकाश शिवशंकर चाटी (वय २०), विक्की उर्फ उमाकांत शिवशंकर चाटी (वय २२, रा. सर्वजण दक्षिण कसबा, सोलापूर), ज्ञानेश्वर विलास कोटमळे (वय २२, रा. किणी, अक्कलकोट), किसन गडदूर (वय १८, रा. सिव्हिल चौक, गाईचा कोंडवडा, सोलापूर) यांना अटक झाली आहे. एकजण अल्पवयीन आहे. बुधवारी दुपारी आरोपींना न्यायदंडाधिकारी एन. बी. सोनटक्के यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे एम. आय. बेसकर, आरोपींतर्फे शशी कुलकर्णी, प्रशांत नवगिरे, अभिषेक गुंड या वकिलांनी काम पाहिले.

हे पोलिस जखमी झाले
फौजदार विश्वास भांबड, अनिल गावसाणे, वसीम कोरबू हे गंभीर जखमी आहेत. भांबड यांना डोळ्याजवळ मार लागला आहे. रमाकांत लोहार, चिदानंद साखरे, रमाकांत शाली, श्यामराव मोहाळे यांना मुक्का मार लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांचा अंकुश आहे की नाही?
वानकरांच्या फार्म हाऊसवर विनापरवाना डॉल्बी लावण्यात आला होता. तो थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्यापर्यंत तरुणांची मजल गेली. एवढेच नव्हे तर लाकडाने मारहाण झाली. यावरून पोलिसांचा शहरात अंकुश आहे की नाही असा प्रश्न समोर आला आहे.
वानकर यांच्या फार्म हाऊसवर हा गोंधळ झाल्याची माहिती पोलिसांकडे आहे. डॉल्वी लावताना मूळ मालकाची परवानगी घेणे गरजेचे आहे. याप्रकरणात विनापरवाना डॉल्बी लावल्याप्रकरणी कलम १३५ अन्वये (विना परवाना डॉल्वी लावला) गुन्हा दाखल आहे. पण, मूळ मालकावर गुन्हा दाखल का झाला नाही. पोलिस त्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न आहे.