आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Through Agricultur Development Poverty And Unemployment May Decrease : Mla Ganpatrao Deshmukh

शेती विकासातून द‍ारिद्र्य , बेकारी कमी करता येईल : आमदार गणपतराव देशमुख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला - देशाचा विकास करावयाचा असेल तर शेतीचा विकास करावा लागेल. यासाठी शेतीत भांडवल गुंतवणूक करावी लागेल. सिंचन क्षेत्र वाढवून शेती मालाला हमी भाव द्यावा लागेल, तरच दारिद्र्य, बेकारीचे प्रमाण कमी होईल, असे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगितले.

राज्य भूमी परिषद व भूमी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या समारोप सत्रात ते बोलत होते. शेकापचे ज्येष्ठ नेते, डॉ. एन. डी. पाटील, त्रिलोक हजारे, विद्याधर देशपांडे, पल्लवी रेणके, आयोजक प्रमुख कदम व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी देशमुख म्हणाले, ‘‘भारत कृषी प्रधान, देश असला तरी शेतक-याला न्याय मिळत नाही. 68 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र, शेतीतून येणारे उत्पन्न कमी आहे, जी.डी.पी 14 टक्के आहे. त्यामुळे दारिद्र्य, बेकारीचे चित्र दिसत आहे. दुष्काळ कायमचा हटवायचा असेल, तर पाणी आडवा, पाणी जिरवा ही मोहीम राबवणे, महत्त्वाचे आहे.’’अध्यक्षीय भाषणात डॉ. एन. डी. पाटील म्हणाले,‘‘ शेतीचे क्षेत्र कमी होत असून शेतीचे क्षेत्रच आज विविध कारणांनी औद्योगिक वापरासाठी वापरले जात आहे. याचाही विचार होणे गरजेचे आहे.