आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकीट मागितले म्हणून मारहाण; चेन्नई मेलमध्ये घडला प्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- चेन्नईहून मुंबईकडे निघालेल्या मेल एक्स्प्रेसमध्ये तिकीट मागितल्याच्या कारणावरून सोलापूरचे तिकीट पर्यवेक्षक व्ही. एल. राठोड यांना प्रवाशांकडून मारहाण झाली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी राठोड यांनी संबंधित प्रवाशाविरोधात सोलापूर लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. मात्र, ही घटना गुलबर्गा येथे घडली असल्याने गुलबर्गा लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. तिरुपतीहून मुंबईला निघालेल्या प्रवाशांचा मोठा ग्रुप होता. त्यातील प्रवाशांकडे तिकिटाची मागणी केल्यावर काही प्रवासी वारंवार का तिकिटाची मागणी करतात म्हणून तिकीट पर्यवेक्षकांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. बाचाबाचीचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले. राठोड यांचा मोबाइल हिसकावण्यात आला आहे.