आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलमधील ‘तीनपत्ती’चे आकर्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सध्या तीनपत्ती या जुगाराशी साधम्र्य राखणार्‍या मोबाइलवरील खेळाने तरुणाईला वेड लावले आहे. यामध्ये खरेखुरे पैसे टाकावे लागत नसले, तरी हा गेम खेळण्यासाठी तरुणाई तुटून पडत असल्याचे चित्र आहे. स्मार्टफोन बाळगणारे तरुण वेगवेगळ्या अँप्सचा वापर करतात. गेम्स डाउनलोड करून खेळणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा एक प्रकारचा जुगार असल्याने पालकांतून याला विरोध होत आहे.
गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध तीनपत्ती हा गेम सध्या धुमाकूळ घालत आहे. तो डाउनलोड केल्यानंतर प्रारंभी दहा हजार चिप्स मिळतात. यानंतर जिंकण्यासोबत चिप्स अर्थात पॉईंटस् वाढत जातात, तर हरल्यानंतर पुन्हा खेळण्यासाठी मार्केटमधून चिप्स खरेदी केले जातात. पैसा, वेळेचे भान हरपून रात्रीचे दीड-दोन वाजेपर्यंत मोबाइलवर हा खेळ रंगत असल्याचे आढळले आहे.
दरम्यान, या ऑनलाईन खेळावर पालकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. हा एक प्रकारचा जुगारच असून, वेळ व पैशाचा अपव्यय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय सातत्याने मोबाइल हाताळल्याने आरोग्यावर परिणाम होत असल्याने अँप्स, ऑनलाइन गेम्स यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
सतत वापर अयोग्यच
- मोबाइल सतत हाताळल्याने प्रामुख्याने डोळ्यांच्या विकारांचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय अभ्यासाचे नियोजनही कोलमडते. झोपेवर परिणाम होतो.’’ डॉ. अशोक मंत्री
यावर बंदी हवी
- अभ्यास जितका मन लावून केला जात नाही तितके मुलं या खेळात रमलेली असतात. ज्या गोष्टींनी काही फायदा होणार नाही, त्यावर बंदी हवी, यामुळे वेळ व पैसा वाचेल.’’ भूपेन शेळके, पालक