आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटे दागिने चोरणारी महिला अटकेत, चार तासांत कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पूर्व मंगळवार पेठेतील अनुप वेर्णेकर यांच्या दुकानात झालेली चोरी जोडभावी पोलिसांनी चार तासांत उघडकीस आणली. या प्रकरणी संशयित म्हणून नसरीन इफरान शेख (वय 30, रा. विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) या महिलेला अटक झाली आहे. रविवारी न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 295 ग्रॅम चांदी, 26 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. वर्णेकर यांच्या दुकानात ती महिला शनिवारी सायंकाळी चारच्या सुमाराला आली होती. दागिने पाहण्याचा बहाणा करून चार ग्रॅमचे दागिने पळविले. दुकानदारांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वेर्णेकर आणि पोलिस पथकाने शोध घेतला असता तीन-चार तासांनंतर ती महिला सराफ बाजारातच फिरताना आढळली. उवेर्णेकर यांनी त्या महिलेला ओळखले. चौकशीदरम्यान तिने चोरीची कबुली दिली. पिशवीची पाहणी केली असता चोरीला गेलेले चार ग्रॅमचे दागिने आढळले. त्याशिवाय आणखी सोने, चांदी दागिने घरात सापडले आहेत. ते दागिने कोठून आले याची चौकशी सुरू असल्याचे फौजदार गोरख कुंभार यांनी सांगितले. हवालदार चेंडके, सुनील मोटे, शशिकांत सावंत, बाळासाहेब पालकर, प्रकाश राठोड, महिला पोलिस मेहेर या पथकाने ही कारवाई केली.

सीसीटीव्ही यंत्रणा हवी
वेर्णेकरांच्या दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद होती. सोलापुरातील सराफ बाजार, बँक, महत्त्वाची कार्यालये, दुकाने, हॉटेल या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित पाहिजे.