आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंबाखूमुळे सुमारे २० कोटींना आजार, श्वसन, मेंदूचे आजार होण्याचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात तंबाखू सेवनाचे विविध प्रकार आहेत. उदा. सिगारेट, विडी ओढणे, गुटखा, पान मसाला, खैनी आदी. समाजातल्या सर्वस्तरातील सर्व वयोगटातील लोकांसाठी अगदी सहजपणे स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या तंबाखूमुळे सुमारे २० कोटी लोक विविध आजारांनी त्रस्त आहेत. प्रत्येक क्षणाला सुमारे एक कोटी आजारी पडतात. यातील बहुसंख्य रुग्ण हे तरुण वयाचे आहेत. या पेक्षाही गंभीर बाब म्हणजे दरवर्षी देशात लाख लोकांचा मृत्यू होतो.
सिगारेटच्या धुरात विविध प्रकारची विषारी हानीकारक अशी चार हजार केमिकल्स असतात. तंबाखूमुळे दमा, फुफ्फुस, हृदय, मंेदू, पित्त, अल्सरचे आदी आजार उद््भवतात. गंभीर परिणाम, नपुंसकता येण्यात होतो. गर्भवती माता तंबाखू सेवन करत असेल तर बाळाची वाढ खुंटते. सगळ्यात मोठा धोका म्हणजे कॅन्सरचा. आठ ते दहा प्रकार आहेत.
सिगारेटच्या पाकिटावर धोक्याच्या सूचना, सिगारेट ओढण्यावर बंदी, गुटखा उत्पादन विक्रीवर बंदी आदी प्रकारच्या योजना सरकार राबवत आहे. व्यसन सोडण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तंबाखू सोडण्यासाठी सोप्या उपाययोजना
ठामनिर्णय घ्या आणि तंबाखू सोडण्याची तारीख ठरवा.
पाणी फळाचा रस घ्या. मद्यपान आणि अति चहा टाळणे.
जेवनानंतर तलफ आल्यास पेपरमींटची गोळी, टॉफी चघळा.
नियमित व्यायाम केल्यास सिगारेट, तंबाखूची तल्लफ कमी होते.
आपल्यासमोर कोणाला तंबाखू सेवन करू देऊ नका.
बातम्या आणखी आहेत...