आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखूवर जास्त कर लावा, सेवन थांबवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तंबाखूच्या सेवनामुळे अनेकांवर जीव गमाविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखूचे सेवन थांबवायचे असेल तर सरकारने तंबाखूवरील टॅक्स वाढवावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मृत्यूच्या दारात जाणार्‍यांची संख्या मोठी असल्याने हा धोक्याच्या इशारा समजावा, असे असे आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूमुक्त जगासाठी तंबाखूवरील कर वाढवून त्याचा वापर कमी करावा आणि अनेकांचे जीव वाचावेत अशी या वर्षीची आरोग्य संघटनेचे संकल्पना स्पष्ट केली आहे. त्याचप्रमाणे या उत्पादनांच्या वाढत्या किमतीबरोबर सार्वजनिक ठिकाणी व्यसने करण्यावर निर्बंध येण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या पाहिजे. देशात 25 लाख कॅन्सर रुग्ण असून दरवर्षी नव्याने सात लाख रुग्णांची भर पडते. तर एक लाख रुग्णामागे 61 पुरुष व 58 महिलांचा कॅन्सरने मृत्यू पावतात. सोलापुरातही कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
आरोग्य संघटनेचा अहवाल म्हणतोय.. :
सिगारेट, सिगार आणि इतर प्रकरच्या तंबाखूच्या व्यसनांवर उपाययोजना केल्या नाही तर 2030 पर्यंत तंबाखूमुळे मृत्यू पावणार्‍यांची संख्या 80 लाखांपर्यंत जावू शकतं, अशी धक्कादायक माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रसिद्ध केलीय. 15 वर्षांहून अधिक काळ धूम्रपान करतात त्यांच्यापैकी 30 ते 50 टक्के लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो. तंबाखूच्या ससंर्गाने होणार्‍या मृत्यूची संख्या इतर कुठल्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपेक्षा जास्त आहे, असे आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.