आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज खग्रास चंद्रग्रहण, केवळ मोक्ष दिसेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चैत्रपौर्णिमेच्या दिवशी शनिवारी दुपारी ३.४५ ते सायंकाळी ७.१५ या वेळेत होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. या ग्रहणाची खग्रास स्थिती सायंकाळी ५.२४ ते ५.३६ या वेळेत असेल. ग्रहण मध्य साडेपाचला होईल. भारतातून जिथे सायंकाळी ७.१५ पूर्वी चंद्रोदय होईल. तेथून हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित खंडाग्रास स्थितीमध्ये दिसेल. ग्रहण स्पर्श, ग्रहण मध्य या अवस्था भारतातून दिसणार नाहीत. फक्त ग्रहण मोक्षच पाहता येईल.
चंद्रग्रहण घडून येण्यासाठी पौर्णिमेचा दिवस असावा लागतो. सूर्य-पृथ्वी-चंद्र या तिन्ही गोलांचे मध्य एका सरळ रेषेत आणि पातळीत असावे लागतात. चंद्र त्याच्या परिभ्रमण मार्गातून पृथ्वीच्या शंकूच्या आकाराच्या दाट सावलीतून जातो. त्यावेळी तो पूर्णपणे दिसेनासा होतो. याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्र अंशत: दिसेनासा झाल्यास खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात.


विज्ञानयुगात अंधश्रद्धा
विज्ञानयुगातसुद्धा ग्रहणासंदर्भात समाजात अनेक अंधश्रद्धा रूढ आहेत. ग्रहणात फिरू नये, जेवण करू नये. गर्भवतीने ग्रहण पाहू नये. ग्रहण संपल्यावर दान करावे. अंघोळ करावी. याला विज्ञानात आधार नाही. मानवी जीवनावर याचा काेणताही वाईट परिणाम होत नसतो. अशा खगोलीय घटना ठरावीक वर्षांनंतर नेहमी होत असतात. या त्यामुळे कर्मकांडाच्या मागे लागता, या विलोभनीय खगोलीय घटनेचे निरीक्षण करून त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. अशोक जडे यांनी केले.

महाप्रसाद रविवारी करा
ग्रहणाचा पर्व काळ सूर्यास्तापासून रात्री ७.१५ वाजेपर्यंत आहे. वेध शनिवारी सूर्योदयापासून सुरू होत असून या काळात स्नान, देवपूजा, कुलधर्म-कुलाचाराची कर्मे करता येतील. नैवेद्यापुरता स्वयंपाक करून देवाला दाखविता येईल. वेधामध्ये भोजन निषेध सांगितल्याने कुलधर्म-कुलाचाराचे भोजन दुसरे दिवशी घालावे. हनुमान जयंती वेधकाळात करून जयंतीचे अन्नदान (भंडारा-पारणा) दुसरे दिवशी रविवारी करावे. मोहनदाते, पंचांगकर्ते