आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज ऊन जरा जास्तच, यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी उन्हाचा पारा चढल्याने सोलापूरकरांच्या अंगाची लाही-लाही झाली. तापमापकातील पारा 41.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला. उन्हाने यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांक गाठल्याने ‘आज ऊन जरा जास्तच आहे’, असे म्हणायची वेळ शहरवासीयांवर आली.

सोमवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले होते. दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव जाणवत आहे. असह्य करणार्‍या उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठे रूमाल, टोप्या आणि गॉगल्सच्या खरेदीकडे कल वाढतो आहे.

वाढलेल्या उन्हामुळे उकाडा वाढला आहे. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी नागरिक शक्यतो सकाळीच कामे अटोपून घेत आहेत किंवा सायंकाळी घराबाहेर पडत आहेत. दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असताना त्यात आता वाढत्या उन्हाची भर पडली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी चौकांतील शीतपेयांच्या गाड्यांकडे पावले वळू लागली आहेत.


भरपूर पाणी प्या
उन्हामुळे सनबर्न, थकव्याचा त्रास जाणवतो. उन्हात फिरले असता घामामुळे शरीरातील पाणी कमी हेाते. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याची सवय लावावी. थंड पेय पिण्याऐवजी लिंबू सरबत, आवळा पाणी, शहाळय़ातील पाण्याला प्राध्यान्य द्यावे. त्यामुळे शरीरातील क्षार नियंत्रित राहतात.’’ डॉ. ललिता पेठकर, आहार तज्ज्ञ, सोलापूर

पारा चढतोय
41.6 अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद, आग ओकणार्‍या सूर्यदेवाच्या बचावासाठी रूमाल, टोपी आणि गागल्स खरेदीकडे कल


तापमान असे
40.2
29 मार्च
39.3
30 मार्च
39.38
31 मार्च
41.6
1 एप्रिल