आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीतून भीमेत येणार आज पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उजनी धरणातून भीमा नदीत शुक्रवारी सायंकाळी साडेचार टीएमसी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा खात्याचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटेल. औज बंधार्‍यातील पाणीसाठा संपल्याने शहराच्या अनेक भागांत गुरुवारी पाणीपुरवठा झाला नाही. हिप्परगा तलावातील पाणी घेण्यावर निर्बंध आल्याने हद्दवाढ भागातील पाणीपुरवठाही विस्कळीत झाला.

या पार्श्वभूमीवर उजनीतून पाणी सोडणे गरजेचे होते. जलसंपदा खात्याने त्याची दखल घेऊन सोलापूरकरांना दिलासा दिला आहे. कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून पाणी मिळवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे उजनीकडेच शहरवासीयांचे लक्ष लागून होते.