आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालय घोटाळ्याची इन कॅमेरा चौकशी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्य शासनाने गरिबांसाठी ‘घर तेथे शौचालय’ या योजनेअंतर्गत जुना प्रभाग 68 मध्ये 1013 शौचालये बांधली. पण त्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. आम आदमी पार्टीने महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार पालिकेच्या नागरी वस्ती समुदाय विभागाच्या (यूसीडी) वतीने मंगळवार इन कॅमेरा चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. त्याचा अंतिम अहवाल तीन दिवसात महापालिका आयुक्तांना देण्यात येईल, अशी माहिती यूसीडी विभाग प्रमुख लक्ष्मण बाके यांनी दिली.
भारत कन्स्ट्रक्शनकडून लष्कर, लोधी गल्ली परिसरात करण्यात आले काम

91 लाख 17 हजारांचा निधी
वॉर्ड क्रमांक 68 मधील लष्कर, लोधीगल्ली परिसरात भारत कन्ट्रक्शनकडून भारत मन्सावाले यांनी 1013 शौचालये बांधली. प्रत्येक शौचालयास 9 हजार रुपयांप्रमाणे महापालिकेने 91 लाख 17 हजार रुपयांचा निधी दिला.

इन कॅमेरा चौकशी सुरू
1013 लाभार्थीची यादी यूसीडी विभागाकडे गवसु विभागाने दिली. त्यानुसार प्रत्येक लाभार्थीकडे जाऊन इन कॅमेरा चौकशी करण्यात येत आहे. संगमेश्वर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख मंगलमूर्ती घोमटेसह 14 विद्यार्थी इन कॅमेरा चौकशी करत आहेत. दोन पथक करून पोलिस बंदोबस्तात चौकशी करण्यात येत आहे.
आम आदमी पार्टीने केला प्रकरणाचा पर्दाफाश
आम आदमी पार्टीचे विजयसिंह गुंगेवाले यांनी माहिती अधिकाराखाली भारत कन्ट्रक्शनच्या कामाची माहिती मागितली. त्यामुळे मन्सावाले यांनी खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश यूसीडी विभागास दिले.