आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टोल घेता तसे चांगले रस्तेही बनवा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एमएसआरडीसी रस्त्यांसाठी नागरिकांकडून टोल आणि इंधन अधिभार लावून रक्कम वसूल होते तर चांगले रस्तेही बनवून दिले पाहिजे, अशी भूमिका विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे आणि दिलीप माने या तीनही आमदारांनी मांडली. या विषयावर एक फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्तांसोबत बैठक होणार आहे.

खास बाब म्हणून निधी द्यावा
शहरात खराब रस्त्यांसाठी टोल घेतला जातो. माझ्या मतदार संघात रस्ता खराब असून, तो धोकादायक आहे. चांगले रस्ते देण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. एमएसआरडीसीच्या रस्त्यांबाबत माहिती घेण्यासाठी मी महापालिका आयुक्तांसोबत एक फेब्रुवारी रोजी बैठक घेणार आहे. पालिकेकडे रक्कम नसेल तर शासन पातळीवर बैठक घेऊन खास बाब म्हणून शासनाने निधी द्यावा, अशी मागणी मी करणार आहे.’’ प्रणिती शिंदे, आमदार (काँग्रेस)

काम नसताना वसुली सुरू
एमएसआरडीसीकडून शहरात 100 टक्के काम गेल्या दहा वर्षांत झाले नाही. तरीही टोल आणि इंधन अधिभार लावून वसुली सुरू आहे. टोल त्यांनी घ्यायचा आणि रस्ते महापालिकेने दुरुस्त करायचे हा कुठला न्याय. महापालिकेला दरवर्षी 12 कोटींचा फटका बसणार आहे. त्याची तरतूद करायची कोठून. शहरातील एमएसआरडीसी रस्त्यांबाबत मी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून चौकशी लावली, पण सत्ताधार्‍यांनी ती केली नाही.’’ विजयकुमार देशमुख, आमदार, भाजपा

ते टेंडर मॅनेज करून काढले
एमएसआरडीसी आणि महापालिका यांच्यात करार झाला, तो चुकीचा आहे. जोवर टोल घेतला जातो तोवर टोल घेणार्‍यानेच रस्त्यांची दुरुस्ती केली पाहिजे. महापालिकेने रस्ते दुरुस्त करावेत असे टेंडरमध्ये असेल तर ते मॅनेज टेंडर असेल. त्याची चौकशी झाली पाहिजे. आयुक्तांशी माझी चर्चा झाली आहे. तोडगा निघाला नाही तर मी न्यायालयात जाणार आहे. माझ्या मतदार संघातील एमएसआरडीसीचे रस्ते खराब आहेत.’’ दिलीप माने, आमदार (काँग्रेस)