आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जकात नाक्यावरील अपहार; दोघे निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तुळजापूर जकात नाक्यावर एस्कॉर्टच्या रकमेत 16 हजार 380 रुपयांचा अपहार केल्याचा संशय असल्याने आयातकर निरीक्षक जगन्नाथ बनसोडे आणि नाका कारकून सुदर्शन सरवदे या दोघांचे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या मान्यतेने साहाय्यक आयुक्त अजित खंदारे यांनी गुरुवारी निलंबित केले. दरम्यान, या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश ए. व्ही कुर्णे यांनी 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बुधवारी तुळजापूर जकात नाक्याची अचानक पाहणी केली. त्यावेळी कर्मचार्‍यांकडे वसूल केलेली पूर्ण रक्कम आढळली नाही. त्यामुळे साहाय्यक आयुक्त अजित खंदारे यांच्यामार्फत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सरकार पक्षातर्फे अँड. एस. सी. शिंदे यांनी काम पाहिले.

कामगार संघटना आयुक्तांच्या पाठीशी
महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव म्हणाले, ‘‘महापालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत शिस्तप्रिय आयुक्त लाभल्यामुळे मनपास आर्थिक बळकटी येईल, अशी आशा निर्माण झाली आहे. चुकीचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पाठीशी कर्मचारी संघटना राहणार नाही. तुळजापूर नाक्यावर आयुक्तांनी केलेली कारवाई योग्य आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो.’

जनतेकडून पैसे घेऊन मनपाच्या तिजोरीत न भरणार्‍या व्यापार्‍यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करण्याचे धाडसही दाखवावे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.’’ अशोक जानराव, अध्यक्ष, महापालिका कर्मचारी संघटना