आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांसाठी 32 कोटींची टोल वसुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) 2002 मध्ये करण्यात आलेल्या रस्त्यांची आता चाळण झालेली आहे. दुरुस्तीचे काम बाजूला सोडून टोल वसुली आणि इंधन अधिभार वसुली मात्र जोमाने सुरू आहे. दहा वर्षात सुमारे 32 कोटींचा टोल वसूल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रस्त्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल होत असले तरी नागरिकांना खड्डय़ांतूनच मार्ग काढावा लागत आहे.

2002 मध्ये शहरातील 31 किमीचे रस्ते झाले. यासाठी 86 कोटी खर्च झाले. या खर्चापोटी टोल व इंधन अधिभाराच्या माध्यमातून वाहनधारक व नागरिकांकडून वसुली सुरू झाली.

मंगळवेढा, होटगी, अक्कलकोट आणि बार्शी रोड येथील नाक्यावरून टोल सुरू झाला. शिवाय इंधनावर प्रतिलिटर 50 पैसे अधिभार आहे. आतापर्यंत किती अधिभार वसूल केला याची माहिती मनपाकडे नसलाचे सांगण्यात येते.

टोल नाक्यांवर फलक नाही
शहरातील चार टोल नाक्यांवर दर फलक आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागणी केल्याप्रमाणे टोल नाक्यावर आतापर्यंत किती रक्कम वसूल केली याची माहिती दर्शविणारा ऑनलाईन डिजिटल फलक नाही. 2015 पासून टोल वाढ होऊ शकते.

एमएसआरडीसी रस्ते आणि टोलची माहिती महापालिकेकडे नाही. एमएसआरडीसीचे कार्यालय बंद आहे. ’’ संदीप कारंजे. मनपा, रस्ते विभागप्रमुख

शहरातील खड्डय़ांबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. टोलप्रo्नी कोल्हापूरकरांप्रमाणे सोलापूरकरांनी जागृत होणे आवश्यक आहे.’’ अँड. सरोजिनी तमशेट्टी