आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील दोन सोनोग्राफी केंद्रे बंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्ह्यातील आठ सोनोग्राफी केंद्रांच्या नूतनीकरणास व दोन केंद्रांची मान्यता रद्द करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच एका नव्या केंद्रास परवाना देण्यात आला. गर्भलिंग निदान व प्रसूतीपूर्व चाचणी दक्षता सल्लागार समितीची मंगळवारी बैठक झाली. तीत हा निर्णय झाला.
जिल्हाधिकारी गोकुळ मवारे अध्यक्षस्थानी होते. डॉ. सुभाष फडे (अकलूज), वंदना गांधी (अकलूज),अनिल व्होटकर (करमाळा), संजय होर्गेकर (करमाळा), वसंत फुं डे (करमाळा), संदेश शहा (करमाळा), एम. के. इनामदार (अकलूज), वसंतदादा काळे ट्रस्ट जनकल्याण हॉस्पिटल (पंढरपूर) या केंद्रांच्या नूतनीकरणास मान्यता देण्यात आली. पंढरपूर येथील डॉ. अभिजित फडीया यांच्या नव्या केंद्राला मान्यता देण्यात आली. जिल्ह्यात 89 व शहरात 120 असे एकूण 209 केंद्रे सुरू आहेत. डॉ. नीलेश थिटे (कुडरुवाडी) आणि नितीन थिटे (टेंभुर्णी) यांनी सोनोग्राफी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.