आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बच्चे कंपनीसाठी "टॉय रूम'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात(सिव्हिल) उपचाराकरता आलेल्या गरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे मनोरंजन व्हावे, त्यांच्याकडून उपचाराला चांगला प्रतिसाद मिळावा, याकरता उमेद ग्रूपने किलबिल टॉय रूमचा उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ गुरुवारी माजी अधिष्ठाता डॉ. प्रभाकर गायकवाड यांच्या हस्ते झाला.
सिव्हिलमध्ये उपचाराकरता दाखल झालेली ही मुले इंजेक्शन, डाॅक्टर, नर्स यांना घाबरलेली असतात. त्यांची भीती दूर व्हावी, उपचाराला योग्य प्रतिसाद मिळावा, या उद्देशाने उमेद ग्रुपने टॉय रूमची संकल्पना प्रत्यक्षात आणली. या टॉय रूममध्ये घसरगुंडी, खेळण्याचा हत्ती, लहान मुलांची सायकल, सी-सॉ, सर्व प्रकारचे बाहुले आदी साहित्य ठेवण्यात आले आहेत. उपचारासह मुलांचे मनोरंजन व्हावे, हा उद्देश आहे. यशिवाय लहान मुलांच्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी, याकरता गोष्टी, कथेची पुस्तके, रंगरंगोटीची पुस्तके, मुळाक्षरांची पुस्तके उपलब्ध केली आहेत. या टॉय रूमसाठी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्यासह विभाग प्रमुख, सहयोगी सहाय्यक प्राध्यापक, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनीही मदत केली. शिवाय सामाजिक बांधिलकी जपत अनेकांनी विविध खेळणी वस्तू देऊन सहकार्य केले.
मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी
डॉक्टर त्यांच्याकडून होणारे उपचार याबद्दल मुलांच्या मनातील भीती दूर व्हावी, त्यांच्याकडून उपचारास प्रतिसाद मिळावा हा उद्देश आहे. मुलांना लवकर आजारातून बाहेर काढावे मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटावे, या संकल्पनेतून टॉय रूमची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.''
डॉ.राजाराम पोवार, अधिष्ठाता, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर