आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक पेटला; 600 साखर पोती खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर- पुणे रस्त्यावर केगाव येथे रस्त्याच्या कडेला थांबलेला ट्रक अचानक पेटल्याने ट्रकसह पन्नास किलो वजनाची 600 साखर पोती जागेवरच जळून खाक झाली. रविवारी पहाटे ही घटना घडली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

शनिवारी साखर पोत्यांनी भरलेला ट्रक (एम एच 12, ए एक्स 2319) पुण्याकडे निघाला होता. केगाव येथे आल्यानंतर चालक हेमंत सुभाष नागरे यांनी आराम करण्यासाठी रस्त्याच्या कडेला ट्रक लावला. साखरेची पन्नास किलो वजनाची सहाशे पोती ट्रकमध्ये होती. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक ट्रकला आग लागली. त्यानंतर अग्निशामक दलाला कळवण्यात आले. अग्निशामक कर्मचार्‍यांनी तीन बंब वापरून आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमणे कारण समजू शकले नाही. याबाबत भीमराज जनार्दन चव्हाण यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद नोंद केली.