आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक शाखेचे काम आता दोन विभागात; वायकर उत्तरचा तर शिर्के यांच्याकडे दक्षिणचा कार्यभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाहतूक नियोजन सुरळीत होण्यासाठी आता दक्षिण व उत्तर असे दोन विभाग करण्यात येणार आहेत. मागील सोमवारी पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी उत्तरचा (जुनी फौजदार चावडी) कार्यभार पाहण्यास सुरुवात केला आहे. दक्षिण (सरस्वती चौक) येथे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के राहतील. उत्तर विभागाकडे जेल रोड, जोडभावी, एमआयडीसी तर दक्षिणकडे सदर बझार, फौजदार चावडी, सलगरवस्ती, विजापूर नाका पोलिस ठाण्याचा परिसर राहील.

वाहतूक कामकाजात सुसूत्रपणा येण्यासासाठे पूर्ववत दोन विभाग 1 जुलैपासून सक्षमपणे सुरू होतील, असे साहाय्यक आयुक्त मोरेश्वर अत्राम यांनी सांगितले. याबाबत पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनाही प्रस्ताव दिल्याचे ते म्हणाले. तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वाहतूक शाखेचे दोन विभाजन केले होते. मात्र, मागील वर्षभरापासून उत्तर विभागाला पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी दिला नव्हता. तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील हे निवृत्त झाल्यापासून पद रिक्तच होते. आता त्या जागी श्री. वायकर यांची नियुुक्ती झाली आहे.
अ‍ॅपेरिक्षा ओव्हरसीट प्रवास सुरूच
अ‍ॅपेरिक्षा व तीन आसनी रिक्षात ओव्हरसीट प्रवासी वाहतूक सुरूच आहे. कारवाईत नेहमीच धरसोड सुरू असते. गांधीनगर सिग्नल चौकात केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला. ते काम पूर्ण झाल्यानंतर मातीचा ढिगारा काढलेला नाही. मागील रविवारी सायंकाळी सात रस्ता परिसरात बेशिस्त वाहनांवर मोघम कारवाई झाली. सोमवारी पुन्हा सक्षमपणे कारवाई करून 8 हजाराचा दंड वसूल केला होता. मंगळवारी मात्र कारवाई झालीच नाही.
सिग्नल बंदच
सरस्वती चौक, रंगभवन, सिव्हिल चौक, गांधीनगर, पत्रकारभवन चौकातील सिग्नल मंगळवारी बंदच होते. तेरा सिग्नलपैकी फक्त दोनच चौकात सुरू आहेत. सिग्नल सुरू ठेवण्यात महापालिका विद्युत विभाग उदासीन असल्याचे दिसून येते. बीओटी तत्त्वावर दुरुस्ती देखभाल आहे. मक्तेदार हे काम पूर्ण का करीत नाहीत. पोलिसही पाठपुरावा करीत नाहीत.