आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली, पदयात्रेमुळे वाहतूक विस्कळीत, शहर उत्तर, दक्षिणमध्ये अर्ज भरण्यासाठी चुरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बलिदानचौकातील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून सकाळी चाकोते यांच्यासाठी पदयात्रेस सुरुवात झाली. उघड्या जीपवर उमेदवार चाकोते यांच्यासह श्री. शिंदे, प्रणिती शिंदे होते. त्यांच्यासोबत आलेला कार्यकर्त्यांचा ताफा पदयात्रेत सहभागी झाला. त्यामुळे पदयात्रेला भव्यतेचे स्वरूप आले. तुळजापूर वेस ते मधला मारुतीपर्यंत शिंदे पिता-कन्या चाकोते यांच्यासोबत होते. त्यानंतर त्यांनी निरोप घेतला. पुढे टिळक चौक, बाळीवेस, माणिक चौक, आजोबा गणपती, विजापूर वेसमार्गे ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात पोचली. अर्ज दाखल करताना महापौर आबुटे, श्री. यलगुलवार, बाजार समितीचे सभापती राजशेखर शिवदारे, सिद्धाराम चाकोते, सुप्रिता चाकोते, जाबीर अल्लोळी आदी होते.
सपाटेंचे शक्तिप्रदर्शन
श्री.सपाटे यांनी पांजरपोळ चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेस सुरवात केली. त्यांच्या सोबत माजी उपमहापौर पद्माकर काळे, राजेंद्र कलंत्री, लता फुटाणे, रेखा सपाटे, जावेद खैरदी, विजय फुटाणे, नाना सलगर, ज्ञानेश्वर सपाटे, हरिदास गायकवाड, दत्ता शिंदे, हणमंतु बेसुळके, बजरंग आवताडे, दत्ता पवार, नामदेव थोरात, महादेव गवळी आदी होते.
युतीतुटल्याचा देशमुखांच्या पदयात्रेवर परिणाम
गुरूवारीयुती तुटण्यापूर्वी शहर मध्यमधून सेनेच्या वतीने महेश कोठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार देशमुख उपस्थित होते. मात्र शुक्रवारी देशमुख यांनी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या पदयात्रेत सेनेचे नेते नव्हते. युती तुटल्याचा परिणाम पदयात्रेवर दिसून आला.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून पदयात्रा मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, लक्ष्मी मंडई, पंचकट्टा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयातील शहर उत्तर निवडणूक कार्यालयापर्यंत आली. रॅलीत मोटारसायकल ढोल पथकाचा समावेश होता. नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, संजय कोळी, शिवानंद पाटील, प्रा. अशोक निंबर्गी, अमर पुदाले, नगरसेविका इंदीरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली आणि अनुजा कुलकर्णी, शोभा नष्टे, बिज्जू प्रधाने आदींचा सहभाग होता.
उत्तरसाठी बसपकडून जानराव यांनी अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, बबलू गायकवाड आदी. रविकांत पाटील यांनीही अर्ज भरला. यावेळी त्यांचे बंधू रतिकांत पाटील उपस्थित होते.शहर उत्तरसाठी माजी महापौर मनोहर सपाटे यांनी शक्तिप्रदर्शन करत शुक्रवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शहर उत्तर मधून माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी शक्तीप्रदर्शन केले.दक्षिण सोलापूर मतदारसंघात सुरेश हसापुरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. शिवसेनेचे माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.