आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावीर चौकात 106 चाकांचा ट्रक फसला; वाहतूक कूर्मगतीने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- फताटेवाडी येथील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या वीज प्रकल्पासाठी 60 फूट लांबीचा बॉयलर घेऊन जाणारा 106 चाकांचा ट्रक जाताना जुना होटगी नाका येथे अडकला. क्लच प्लेट नादुरुस्त होऊन रस्त्यातच आडवा थांबल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. होटगी रस्त्याकडे वळताना चालकाचा अंदाज चुकला. दुभाजकाला त्याचे केबिन धडकल्यामुळे चाक पंक्चर झाले. सोमवारी साडेतीनच्या सुमाराला हा
प्रकार घडला.

  • पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के व त्यांचे पथक नियोजनासाठी प्रयत्न करीत होते.
  • एनटीपीसीकडे अडीचशे टन वजन ओढण्याची क्रेन आहे, ती रात्री आली.
  • ट्रकला 106 चाके, महाराष्ट्रात प्रवेश करताना 36 हजार आरटीओत भरला दंड
  • होटगी रोड व गुरुनानक मार्गावर वाहतूक विस्कळीत
  • पोलिसांकडे असलेली क्रेन कंटेनर ओढू शकली नाही.
  • बॉयलरचे वजन 66 टन आणि 60 फूट लांब
  • क्लच प्लेट दुरुस्तीसाठी तीन लाख खर्च येणार
  • ट्रकची वाहतूक क्षमता अडीचशे टन