आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक खोळंबली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - संभाजीतलावात पोहताना पाण्यात बुडून हमीद बाबन शेख (वय ४५, रा. श्रीशैल मल्लिकार्जु नगर, मुलतानी बेकरी समोर) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमाराला घडली. शेख हे रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ विक्री करत होते.

रिझवान हमीद दुचाकीवर संभाजी तलावाजवळ आले. हमीद हे पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कळताच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे विजापूर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सायंकाळी पाचच्या सुमाराला मृतदेह पाण्यातून वर काढण्यात आला. फौजदार राजेंद्र माळी, हवालदार जाधव, कुलकर्णी या पथकाने शासकीय रुग्णालयात येऊन माहिती घेतली.

तलावातून मृतदेह काढणे सुरू असताना बघ्यांची गर्दी होऊन विजापूर रस्त्यावर वाहतूक खोळंबली.