आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी चौकात वाहतुकीची बेशिस्त अन् पोलिसांची बघ्यांची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिवाजी (पांजरापोळ) चौकात वाहतुकीचे नियम पाळाले जात नसल्याने कायम वाहतुकीची कोंडी होते. शनिवारी तर कहरच झाला. लग्नाच्या वरातीमुळे भर दुपारी शिवाजी चौक ते नवीवेस पोलिस चौकी दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली.
बेशिस्तपणे वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टमटम, खासगी बस, याशिवाय रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. दुसरीकडे वाहतूक शिस्तीसाठी तैनात पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते.
वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न
शिवाजी चौकात पडणारा ताण टाळण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या चौकात थांबणाऱ्या गाड्यांसाठी पर्यायी मार्गाच्या शोधात आहोत. याबाबत आरटीओशी बोलणे सुरू आहे. लवकरच याबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्यात येईल.'' -यशवंत शिर्के, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा