आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पोलिसांना आता मुंबईत प्रशिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील वाहतूक नियोजन सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण देण्यात येत आहे. पंधरा दिवसांचे हे प्रशिक्षण असून दहा कर्मचारी व दोन अधिकारी यांचे प्रशिक्षण सध्या मुंबई पोलिस मुख्यालयात सुरू आहे. दरम्यान, जुना होटगी नाका, गांधीनगर चौकातील सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती झाली असून शुक्रवारी पोलिसांनी वाहतूक नियोजन सुरू केले आहे. दोन महिन्यांपासून वायर शॉर्टसर्किट झाल्यामुळे सिग्नल बंद होते. याशिवाय सिव्हिल चौकातही वायरिंगचे काम करण्यात आले आहे. रविवारी आसरा, गांधीनगर, जुना एम्प्लॉयमेंट चौक,पत्रकारभवन, डफरीन, सिव्हिल चौकातील सिग्नल बंदच होते. सातरस्ता परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. आसरा चौकात मात्र पोलिस पॉइंट नव्हते हे विशेष.
मार्केट यार्ड, भय्या चौकात पाहणी कधी : भय्या चौकात नवीन सिग्नल बसविण्यासाठी टेंडर मंजूर झाले आहे. तर मार्केट यार्ड चौकात नवीन सिग्नल बसविण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. हे काम कसे करणार, निधी कोठून आणणार, सिग्नल कसे बसवावे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी महापालिका विद्युत विभाग व वाहतूक पोलिस यांच्यात संयुक्त बैठक होण्याची गरज आहे. अद्याप ती झाली नसल्यामुळे पुढील निर्णय थांबले आहेत.
वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण
शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या सव्वाशे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना मुंबईत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दहा कर्मचारी, दोन अधिकारी असे पंधरा दिवस पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण घेतील. अशा टप्प्याने सर्वांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई पोलिस मुख्यालयात वाहतूक शाखेकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहन संख्या पाहाता याची गरज आहे. यामुळे वाहतूक नियोजन सोलापुरात चांगले होईल, अशी अपेक्षा असल्याचे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.