आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक नियम तोडणार्‍यांना पोलिस समन्स देणार का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सिग्नल चौकात झेब्रा क्रॉसचे नियम मोडणे, मोबाइलवर बोलणे, ट्रीपल सीट जाणे, रिक्षा, अँपेरिक्षात ओहरसिट प्रवासी वाहतूक करणे, वन-वे मार्गाचा दुरुपयोग करणे, वेगाने दुचाकी चालवणे, नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावणे या कारणावरून वाहतूक पोलिस आपणाला दंडात्मक कारवाई करू शकतात. नियम मोडल्यानंतर जर वाहनचालक नाही थांबला तर त्याच्या गाडी नंबरवरून माहिती घेऊन पोलिस घरी दंडात्मक समन्स पाठवणार आहेत. या कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे करणार का हा पश्न आहे.

लवकरच समन्स देणार
मागील तीन दिवसांत पोलिसांनी अशा वाहनांचे नंबर टिपून घेतले आहेत. काही दिवसांत घरी समन्स देणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्रम यांनी बुधवारी दिली. वाहतूक शाखेत येऊन त्यांना दंड भरावाच लागेल असे त्यांनी नमूद केले.

दंडाचे प्रकार व रक्कम
वाहन परवाना नाही (300 रुपये)
रिक्षात ओहरसिट घेणे (100)
वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे (100)
झेब्रा क्रॉसच्या आत न थांबणे (100)
सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे (100)